यश आजबे यांचा शिरूर तालुक्यात झंझावात विकास कामासाठी व दहशत संपवण्यासाठी आ.बाळासाहेब आजबे यांना निवडून द्या ---यश भैया आजबे

 यश आजबे यांचा शिरूर तालुक्यात झंझावात
 विकास कामासाठी व दहशत संपवण्यासाठी आ.बाळासाहेब आजबे यांना निवडून द्या
 ---यश भैया आजबे 



शिरूर प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील  दडपशाही संपवण्यासाठी व मतदार संघाच्या उज्वल भविष्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे काका यांना निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते यश भैय्या आजबे यांनी शिरूर तालुक्यात गाव भेट दरम्यान दरम्यान बोलताना केले .

      आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचा विकास आजपर्यंत मोठ्या प्रमाणात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आ बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार आजबे काकांचा विजय निश्चित समजला जात असून विरोधकाकडून केलेल्या पोकळ घोषणा व भूलथापांना जनतेने बळी पडू नये विकास कामाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर येणारी निवडणूक आपणच जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .पुढे बोलताना यश आजबे  म्हणाले की शिरूर तालुक्याला कधी नव्हे एवढा निधी या पाच वर्षात देण्याचे काम कृषिमंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केले आहे त्यामुळे शिरूर तालुक्यातील जनतेने कृषिमंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आजबे काका यांना विजयी करावे असे आवाहन शेवटी बोलताना त्यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.