मतदार संघातील विकास कामे थांबवणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान देऊ नका
मतदार संघाचा विकास झालेला बघायचा असेल तर मला मतदान रुपी आशीर्वाद द्या - आ. बाळासाहेब आजबे
आष्टी प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांमध्ये मी मतदार संघामध्ये अनेक विकास कामे केली परंतु आपल्या विरोधकांनी अनेक वेळा विकास कामे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मतदार संघाच्या विकासात अडवे येणाऱ्या व्यक्तीला मतदारांनी मतदान करू नये, माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. राहिलेली विकास कामे पूर्ण झालेली पाहीचे असतील तर मला आशीर्वाद द्या अशी साद आ. बाळासाहेब आजबे यांनी मतदारांना घातले आहे.
आमदार बाळासाहेब आजबे हे त्यांच्या प्रचारार्थ सय्यदमिर लोणी, दौलवडगाव आणि दादेगाव येथे आयोजित केलेल्या कॉर्नर सभांमध्ये बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेली पाच वर्ष मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या पाच वर्षाच्या काळामध्ये मला काम करण्यासाठी केवळ दोनच वर्षे मिळाली. या दोन वर्षांमध्ये मी अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला. एवढा विकास निधी यापूर्वी कोणत्याही आमदाराने मतदार संघासाठी आणला नाही. परंतु आपले विरोधक असलेल्या तत्कालीन आमदाराने अनेकवेळा विकास कामे अडकून ठेवले कारण त्यांना मतदार संघाचा विकास झालेले देखवत नाही. दोन दिवसापूर्वी पाटोदा येथे संपन्न झालेला सभेमध्ये विरोधकांनी जो रस्ता मंजूर झाल्याचे फटाकडे वाजून मतदारांना सांगत सुटले होते तोच रस्ता मंजूर करावा असे मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावरून ते कोणता विकास करतात हे दिसून येते. मी माझ्या कार्यकाळामध्ये वर्क ऑर्डर हातात आल्याशिवाय कोणत्याही कामाचे उद्घाटन केलेले नाही. मतदार संघाच्या विकासासाठी मी पाणी आणि वीज या विषयावर भर दिला आहे. तालुक्यामध्ये पाणी उपलब्ध झाले तरच शेतकरी सुखी होईल त्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले आहेत. शिंपोरा ते खुंटेफळ या योजनेतून आष्टी तालुका 1.68 टी एम सी पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्न केले आहेत या प्रयत्नाला यश आले असून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. राहिलेले चार टीएमसी पाणीदेखील मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच या कामामुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणारा आहे.नऊ सबस्टेशन नवीन मंजूर करून घेतले आहेत. नवीन सब स्टेशन मुळे व ट्रान्सफॉर्मर मुळे शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे सांगून जे मतदार संघातील विकास कामांना आडवे येत आहेत. अनेक कामे मंजूर आहेत परंतु यांच्या तक्रारीवरून ते कामे थांबली आहेत. अशा मतदारसंघाच्या विकास कामांना आडवे येणाऱ्या व्यक्तीला मतदारांनी मतदान करू नये असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या कॉर्नर सभाना कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected