पाटोदा तालुक्यात युवा नेते महेश आजबेंचा झंझावात
ग्रामीण भागात आ. आजबेंना मतदारांचा मोठा प्रतिसाद
आष्टी प्रतिनिधी : आ. बाळासाहेब आजबे यांचे पुतणे युवा नेते महेश यांनी आमदार आजबे यांच्या प्रचारासाठी पाटोदा तालुका पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रचार दौऱ्याला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून मतदारांचा कौलही मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचे सध्या रणधुमाळी सुरू असून सर्वच नेते आणि नातेवाईक प्रचारांमध्ये उतरलेले दिसत आहेत. यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुतणे युवा नेते महेश आजबे हे देखील आमदार बाळासाहेब आजबे यांचा जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे. पाटोदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे. या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मतदारांचा कौल देखील आमदार आजबेंना मिळत असल्याचे दिसत आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये पाटोदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणला आहे पाटोदा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेले असल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेने आमदार बाळासाहेब आजबे यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत पुढच्या काळात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात राहिलेले विकास कामे पूर्ण करण्यात येतील असा विश्वास महेश आजबे प्रचार दौऱ्या दरम्यान मतदारांना देत आहेत.



stay connected