दौलावडगाव गटातील युवकांचा आ आजबे वर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
आष्टी प्रतिनिधी : आमदार बाळासाहेब आजबे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत त्यामुळे सामान्य जनता आमदार आजबे काकावर खुश असून येणाऱ्या पाच वर्षातही ते मोठ्या प्रमाणावर निधी आणतील हा विश्वास आम्हा युवकांना असल्यामुळे दौलावडगाव जिल्हा परिषद गटातील युवकांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दौलावडगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे तसेच बाबासाहेब बिटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी कुसलंबयेथे झालेल्या कॉर्नर सभेमध्ये जाहीर प्रवेश केला आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या कार्यकाळात आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर विकास कामे केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले. आष्टी मतदार संघात आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नवीन बंधारे बांधले आहेत. या बंधार्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. आ. बाळासाहेब आजबे यांचे नेतृत्व हे मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाणारे असल्याने आम्ही सर्व दौलवडगाव गटातील तरुण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे तसेच आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आ. बाळासाहेब आजबे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना या निवडणुकीत विजय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या युवकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब आजबे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही या तरुणांनी व्यक्त केला आहे.
दौलावडगाव जिल्हा परिषद गटातील अभिजीत भांड कृष्णा घोडके, शिवम ओव्हाळ, निलेश घोडके, आकाश भांड, भरत घोडके, अभिषेक भांड, ईश्वर भांड, धीरज घोडके, हरिओम ओव्हाळ या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.


stay connected