*प्रा सुहास चौधरी आम आदमी पार्टीच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी निवड*
-------------------------------------------
बीड. बीड येथे आम आदमी पार्टीची माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बीड येथील जिल्हा संपर्क कार्यालय येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका व पक्षाची भूमिका यावरती चर्चा करण्यात आली त्याच अनुषंगाने आष्टी तालुकाध्यक्ष पदी प्राध्यापक सुहास चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली व सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे आमचे मार्गदर्शक प्रा . राम बोडके युवा नेते स्वप्निल पोटे रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख दत्ता सुरवसे बीड तालुका संघटन मंत्री सुरेश जाधव संतोष चौधरी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected