Balasaheb Ajbe साठी मतदारसंघातील जनता एकवटली मी लेचापेचा नाही तुमचे कमळ तर माझे घड्याळ होऊन जाऊन द्या

 आष्टीत आजबेंची अजब शक्ती...


आ.बाळासाहेब आजबेसाठी मतदारसंघातील जनता एकवटली 
मी लेचापेचा नाही तुमचे कमळ तर माझे घड्याळ होऊन जाऊन द्या





आष्टी प्रतिनिधी - आष्टी विधानसभा निवडणूकिसाठी मातब्बरानी अर्ज दाखल केले असून मंगळवारी आ. बाळासाहेब आजबे काका यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेने गर्दी केली होती 2014 नंतर पुन्हा 2024 ला आष्टीत आजबेंची अजब शक्ती जनतेला पहावयास मिळाली मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावर व विकास कामाच्या जोरावर आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असून हीच जनता पुन्हा एकदा आपल्याला आमदार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी व्यक्त केला.

       भाजपची उमेदवारी सुरेश धस यांना जाहीर झाल्यानंतर आज आमदार बाळासाहेब आजबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणार म्हणून भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन केले होते परंतु भाषणाच्या शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट एबी फॉर्म मिळाल्याचे जाहीर करताच जनतेमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला मी लेचापीचा नाही तुमचे कमळ असेल तर माझे घड्याळ होऊन जाऊ द्या सुट्ट्या खेळ असे आव्हान यावेळी त्यांनी विरोधकांना केले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट एबी फॉर्म लावून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघातील मैत्रीपूर्ण लढत होत आहे .

 आज आष्टी येथे शिवाजी चौक बाजार तळ येथे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली सह जाहीर सभा घेतली यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आष्टी गेल्या पाच वर्षांत आपण मतदार संघात साडेतीन हजार कोटींचे विकास कामे आणली पण हे विकासकामे विरोधकांना दिसण्याआधी त्यांनी आडवाआडवी करण्यावर भर दिला ,आरे या मतदारसंघात तुम्ही कमळाचे चिन्ह आणले पण हा बाळासाहेब आजबे पण राजकारणात लेचा पेचा नाही.या निवडणुकीत होऊन जाऊदे तुझे कमळ तर माझे घड्याळ असे जाहिर सभेत सांगत आमदार आजबे यांनी घड्याळाचा बी फॉर्म मिळाला असल्याचे जाहिर करत माजी आमदार सुरेश धस यांच्यावर जाहिरसभेत हल्ला चढविला आहे.

          आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज मंगळवार दि.29 रोजी भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ.आजबे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ दादा वनवे यांच्यासह माझी जि प सदस्य डॉक्टर मधुकर हंबर्डे पाटोदा तालुका अध्यक्ष दीपक दादा घुमरे शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास भाऊ नागरगोजे आष्टी तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे संचालक सरपंच पंडित पोकळे शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब लटपटे,धैर्यशिल थोरवे, नवनाथ ढाकणे,हारिभाऊ दहातोंडे,महादेव डोके परसराम मराठे विठ्ठल नागरगोजे पोपट शेकडे नामदेव शेळके आजिनाथ गरगटे सरपंच भरत भवर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

      पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,गेल्या पाच वर्षात पोलीस स्टेशनला कधी कोणावर गुन्हा दाखल करा म्हणून साधा फोन केला नाही मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणली वककल गायब करण्याचे काम आम्ही केले नाही तीन जिल्ह्याच्या आमदारांनी गेल्या पाच वर्षात फक्त आडवा आडवी करण्याचे काम केले नगरपंचायतीमध्ये आणलेली कामे सीना बॅरिगेज वर आणलेली कामे उपजिल्हा रुग्णालयाचे काम यासारखे अनेक कामे अडवण्याचे महापाप त्यांनी केले एवढेच नाही तर मतदारसंघात वस्ती व शेतामध्ये जाण्यासाठी 500 किलोमीटरचे पांदण रस्ते मंजूर करून आणली त्या कामांचे बिले आडवण्याची कामही या महाशयाने केले असा कामे आडवणारा माणूस आपल्या दारात सुद्धा उभा करू नका काल झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आमच्यावर टीका करत म्हणाले की हे सातच्या आत घरात जाऊन झोपतात रात्रभर जागून आम्हाला देवस्थानच्या जमिनी घ्यायच्या नाहीत आमची कामे हे अंधारात नाही तर उजेडात करण्याची आम्हाला सवय आहे पंधरा पंधरा वर्षे आमदार राहून शंभर गावांना अजून स्मशानभूमी यांना करता आली नाही त्यांनी आम्हाला विकासाच्या गप्पा मारू नयेत, माय बाप जनतेने दिलेल्या आमदारकीचे पाच वर्षात सोनं करण्यासाठीच आपण झटलो आहोत व येणाऱ्या पाच वर्षातही आपण मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदारकीचा उपयोग करणारा आहोत मतदारसंघात साडेतीन हजार कोटींचा भरघोस निधी आणला आणि हा जर त्यांना दिसत नसेल तर हे दुर्देव आहे.



माजी आमदार व सध्याचे असलेले भाजपचे उमेदवार यांनी फक्त कामे आडविण्याचे काम केले आहे.आणि असा आमदार तुम्हाला पाहिजे असेल तर आपली काहि हरकत नाही.मला पैसे खाण्यासाठी आमदार की नको मला या संधीच सोनं करायचे आहे.मुळात  यांना तालुक्याला पाणि आणायचेच नाही.फक्त देखावा करीत आहेत.पाणि आणायचेच होते तर पंधरा वर्षं काय केले असा सवाल आ.आजबे यांनी विरोधकांना केला.तसेच आमच्या

कार्यकर्त्यांनच्या केसाला धक्का लागला तर मी खोडावर घाव घालीन असा इशाराही आजबे यांनी दिला. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नामांकन व जाहीर सभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी  विठ्ठल नागरगोजे रुपेश बेद्रे दीपक दादा घुमरे विठ्ठल नागरगोजे  पोपट शेकडे विश्वास नागरगोजे नाजिम शेख परसराम मराठे महादेव डोके हरिभाऊ दहातोंडे दिलीप तांदळे सुधीर जगताप  बाबा शेंडगे बाबा भिटे अक्षय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष  नवनाथ तांदळे सुभाष वाळके पप्पू गवळी श्यामराव फसले सतीश कोवक दादासाहेब डोके बाळासाहेब पिसाळ सुभाष वाळके अर्जुन काकडे डॉक्टर सुनील गाडे मुन्नाभाई शेख दिलीप चव्हाण संजय गुंड उपसरपंच बापूसाहेब पवार या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य लोक उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.