श्रीराम वाचनलय आयोजित कडा येथे उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला!

 श्रीराम वाचनलय आयोजित कडा येथे उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला!  



           


   कडा- येथील श्रीराम मंदिरात शुक्रवार दि.४ आक्टोबर ते दि ९ आक्टोंबर  या कालावधीत श्रीराम वाचनलय कडा आयोजित शारदीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले असुन याचा कडा शहरवासियांनी लाभ घ्यावा.



      आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम वाचनलय आयोजित विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीच्या व्याख्यानमालेचे आयोजन दि.४ रोजी शुक्रवार पासून सुरू होणार असून दि ९ रोजी बुधवारी सांगता होणार आहे.या व्याख्यान मालेत दि ४ आक्टोबर रोजी ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर या चे  “मतपत्रिका हीच शक्ती” या विषयावर ,तर शनिवार दि ५ रोजी  विकास उमापुरकर बीड याचे  “माध्यमाचा वापर आणि लोकजागरूता” या विषयावर, तर रविवार दि ६ रोजी डाॅ.अनिता उत्तमराव चव्हाण नाशिक याचे  “दुर्गेचे आधुनिक रूपे” या विषयावर, सोमवार दि ७ रोजी दामोदर प्रकाश रामदाशी पुणे याचे  “समर्थ रामदास स्वामीची उपासना” या विषयावर,मंगळवार दि ८ रोजी  प्रा.डाॅ.अशोक कानडे पाथर्डी याचे  “मंदिर स्थापन्यकला व परंपरा” या विषयावर,तर बुधवार दि ९ आक्टोबर रोजी  डाॅ. विजयकुमार फड निवृत्त IAS अधिकारी संभाजीनगर श्”री.ज्ञानेश्वरीतील आनंद लहरी” या विषयावर व्याख्यान होणार आहेत.श्रीराम वाचनालयाने शारदीय नवरात्रा मधे अखंडपणे गेले ५८ वर्ष ही व्याख्यानमालेची परंपरा चालवली आहे या वर्षी ५९ वे वर्ष आहे या व्याख्यान मालेचा शहरातील नागरिकांनी श्रवणांचा लाभ घ्यावा असे वाचनालयाचे सचिव शंकर देशमुख, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, अध्यक्ष अनिल ढोबळे,वाचनलायाचे सर्व सदस्य तसेच समन्वयक दिपक किंबहुने, समन्वयक समीर पाटील, समन्वयक डाॅ.अशोक गांधी, संयोजन समिती अध्यक्ष डाॅ.हरिदास विधाते यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.