जामखेड ते पैठण व जामखेड ते शिरूर गाडी सुरू करण्याची करा - रवि काका ढोबळे
आष्टी मतदार संघातील शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच कुसळंब, पिंपळवंडी, अंमळनेर येथील प्रवाशांना जामखेड वरून जाण्या येण्यासाठी गैरसोय होत आहे. तसेच जामखेड वरून शिरूर या गावांच्या लोकांनासुध्दा तसेच विद्यार्थी वयोवृध्द आजारी व्यक्ती यांना सुध्दा बस अभावी गैरसोय होत आहे.
त्यामुळे जामखेड कुसळंब, पिंपळवंडी, अंमळनेर मार्गे पैठण व दुसरी गाडी जामखेड, शिरूर, जामखेड अशा दोन गाड्या चालु कराव्यात म्हणजे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल अशी मागणी रवी (काका) ढोबळे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
stay connected