माजी जि.प. सदस्य अशोकराव सव्वाशे यांचा कार्यकर्त्यांसह माजी आ.धोंडे गटात प्रवेश

 आश्ष्टी ( प्रतिनिधी )- 


शिरूर कासार  तालुक्यातील  माजी जि. प. सदस्य अशोकराव सव्वाशे यांनी आपले  समर्थक कार्यकर्ते आणि विघनवाडी येथील ग्रामस्थांसह माजी आ. भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला. विघनवाडी येथे कार्यकर्ता बैठक व प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विघणवाडी येथील गोरक्षनाथ मंदिरात झालेल्या  कार्यक्रमास माजी आ. भीमराव धोंडे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा ,माजी सरपंच बाळासाहेब पवार, दिलीपराव म्हस्के, माजी जि. प. सदस्य मधुकर ढाकणे, युवा नेते किशोर खोले, एम. एन. बडे, आजिनाथ गवळी, युवराज सोनवणे, रासपचे शाम महारनवर व इतरांची उपस्थिती होती.



         यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, अशोकराव सव्वाशे यांनी आपल्याकडे प्रवेश केला आहे त्याबद्दल त्यांचे स्वागत करून तुम्ही विश्वासाने रहा तुम्हाला कधीच कसलीही अडचण येणार नाही असा तुम्हाला शब्द देतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला जवळच्या लोकांनी धोका दिल्याने माझा पराभव झाला. ज्यांना मी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष होण्यासाठी तसेच एकदा आमदार करण्यासाठी सहकार्य केले त्यांनीच मला धोका दिला. माझ्या कार्यकाळात  मी कधीच कोणाची कामे अडवली नाहीत तसेच कधी पोलिसांना फोन केला नाही, कोणत्याही कामात टक्केवारी  घेतली नाही.  सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रशासकीय मान्यता नसलेल्या कामांचे उद्घाटन केले जात आहे. अशोकराव सव्वाशे यांनी सांगितले की, मी ज्या नेत्याकडे होतो त्या आमच्या नेत्यांनी यापूर्वी २००९ पासून मला परिसरातील अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन दिले होते  तसेच २०१४ मध्ये पैठणचे पाणी शिरूर तालुक्याला आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एकही काम न करता फक्त खोटं बोलण्याचे काम केले.  काही प्रकरणात आमच्या कार्यकर्त्यावर खोट्या पोलीस केसेस केल्या. माजी आ. भीमराव धोंडे हे कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाहीत. त्यांच्या संस्थेत मराठा समाजाचे भरपूर कर्मचारी आहेत. दिलीपराव मस्के, बाळासाहेब पवार, किशोर खोले यांच्या संपर्कात आल्याने मी तुमच्या सोबत आल्याचेही सव्वाशे यांनी सांगितले. माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी सांगितले की माझे वडील पाटोदा पंचायत समितीचे सभापती होते ते माजी आ. भीमराव धोंडे यांची कार्यकर्ते होते. तीच परंपरा पुढे ठेवत मी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.  मतदारसंघात शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. त्यांनी  कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, ते एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहेत. भीमराव धोंडे आमदार होणार आहेत त्यामुळेच अशोकराव सव्वाशे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. अशोकराव सव्वाशे यांच्या नेतृत्वाखाली शेषराव कोकाटे, नवनाथ गुजर, लक्ष्मण सव्वाशे, महादेव नेटके, किसन सव्वाशे, गोरख सव्वाशे, हरीभाऊ सव्वाशे, बबन सव्वाशे, आकाश सव्वाशे,अशोक गुजर,अशोक बांदल, बाबासाहेब सव्वाशे, सुनिल सव्वाशे, त्रिंबक सव्वाशे, भाऊसाहेब सव्वाशे, आप्पासाहेब सव्वाशे, जालिंदर सव्वाशे, अंकुश कनुजे, किमन सव्वाशे,भागवत सव्वाशे, अजिनाथ सकुंडे, गणेश सव्वाशे, अनिल मिर‌गे,अनिल कोकाटे, सुनिल कोकाटे, देविदास सव्वाशे,रामा कोकाटे

व इतर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तसेच दिलीपराव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकिन्ही अरुण साठे, संतोष साठे, गोरख माने, अरुण सोनवणे, पोपट जाधव, किसन माने व इतरांनी माजी आ. भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला तसेच कान्होबाची वाडी येथील अशोक बांदल, नारायण सव्वाशे यांनीही प्रवेश केला. याप्रसंगी आजिनाथ गवळी व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम. एन. बडे यांनी केले. कार्यक्रमास शिरूर कासार तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवेश कार्यक्रम व बैठकीस महारुद्र खेडकर,संतोष सानप, दिनकर ढाकणे, बाबुराव कदम, पोपट सिरसाठ,लाभेश गाडेकर,वैभव बडे,अमर माळी,अर्जुन सिरसाठ, कृष्णा सव्वाशे, परसराम घोडके, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटोदा तालुक्यातील पिठी येथे श्री संत जगतगुरु बाळूमामा यांच्या १३२ जन्म सोहळा निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्याला भेट देऊन आरतीसाठी उपस्थिती लावली. यावेळी निर्मळ महाराज बटूळे महाराज, आप्पा माळी यांच्या हस्ते माजी आ. भीमराव धोंडे यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी माजी उपसभापती देविदास शेंडगे,रासपचे अध्यक्ष कल्पेश शेंडगे, ग्रा.पं. सदस्य कचरू काळे, व्यापारी नारायण भोंडवे, माजी सभापती अनिल जायभाय व इतर प्रमुख कार्यकर्त्यांसह बाळूमामाचे भक्तगण उपस्थित होते. 

शिरुर कासार तालुक्यातील माळेवाडी येथे ब्र.भु. गुरुवर्य स्वामी,

नित्यानंद महाराज यांच्या ५ व्या पुण्यतिथी सोहळ्याला भेट दिली.

आमदार होण्याचे शुभ संकेत

माजी आ. भीमराव धोंडे व अशोकराव सव्वाशे हे दोघेही सरळ आणि शांत स्वभावाचे व शब्दाला पक्के असणारे व्यक्तिमत्त्व, त्यामुळे दोघांचे विचार जुळले. अशोकराव सव्वाशे यांचा भीमराव धोंडे गटात प्रवेश आणि काही वेळातच  विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले हा योगायोग आणि भीमराव धोंडे विधानसभा सदस्य होण्याचे शुभ संकेत असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होती. तसेच शिरूर येथून परत येताना मा. आ. भिमराव धोंडे यांनी गहिनीनाथ गडावर जाऊन  यादव महाराज पुण्यतिथी निमित्त दर्शन घेतले तसेच मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचेही आशिर्वाद घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.