दसरा मेळाव्याच्या पुर्वतयारीची माजी आ. भिमराव धोंडे यांच्याकडून पाहणी
आष्टी प्रतिनिधी
भगवान बाबांची जन्मभुमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगड दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शुक्रवारी पुर्व तयारीची पाहणी केली.
यावर्षीचा सावरगाव येथील दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि
या मेळाव्यामध्ये दोघे बहिण भाऊ समाज बांधवांना काय संदेश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दसरा मेळावा हा जसा सामाजिक एकत्रिकरणाचा महत्त्वाचा प्रसंग असला तरी या माध्यमातून राजकारणाची गणिते ठरवली जातात.
त्यामुळे या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राज्यातील व राज्याबाहेरील भगवान बाबा भक्तांना
भगवान भक्ती गडावर दसरा
मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे
आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,माजी सभापती काकासाहेब लांबरुड,अभयराजे धोंडे, जि. प. सदस्य रामदास बडे, दिलीपराव म्हस्के,
संजय कांकरिया, भाऊसाहेब लटपटे, संतोष राख ,माजी सभापती अनिल जायभाय, सुदाम सानप,
व इतर उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी भगवान बाबा, लोकनेते गोपिनाथराव मुंडे,आ. पंकजाताई मुंडे, यांचे मोठ्या आकाराचे कट आऊट लावण्यात आले आहेत. स्टेज पासून १०० फुट अंतरावर कायम स्वरुपी लोखंडी बॅरेगेट तयार करून त्याची फीटींग करण्यात आली आहे तसेच भगवान बाबा यांच्या भव्य पुतळ्यास रंगरंगोटी करण्यात आली आहे. सावरगाव परिसरात साडे तिनशे ते चारशे एकरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तीन किलोमीटर अंतरावर भाषण सहज ऐकु जाईल अशा साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली आहे
stay connected