तालुक्यातील स्वाभिमानी बहुजन समाज बांधवांनी कार्यकर्ता संवाद बैठकीस उपस्थित रहावे .....महासचिव किशोर भोले....
आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर जिल्हा प्रभारी किसन चव्हाण सर मराठवाडा अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने दिनांक १३/१०/२०२४ रविवार रोजी शासकीय विश्रामगृह गेवराई येथे ठिक
११:०० वाजता "कार्यकर्ता संवाद बैठक" आयोजित करण्यात आली असून बैठकीच्या निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे "कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी तालुका निरीक्षक धम्मानंदभाऊ साळवे निरिक्षक अर्जून जवंजळ सर निरीक्षक डॉ गणेश खेमाडे सर जिल्हाध्यक्ष अजय नवनाथ सरवदे जिल्हा महासचिव खंडु देवराव जाधव सह नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पदाधिकारी तथा निरीक्षक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी "कार्यकर्ता संवाद बैठकीस" गेवराई तालुक्यातील सर्व सर्कल प्रमुख सर्व गण प्रमुख,तालुका पदाधिकारी ,शहर कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व आजी माजी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते संवाद बैठकीस मोठ्या संख्येने येणार आहेत तरी गेवराई तालुक्यातील जास्तीत जास्त बहुजन समाज बांधवांने मोठ्या संख्येने"कार्यकर्ता संवाद बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे
stay connected