माजीमंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नातून तालुक्यात 45 कोटी 92 लक्ष रूपये कामांचा शुभारंभ

 माजीमंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नातून तालुक्यात 45 कोटी 92 लक्ष रूपये कामांचा शुभारंभ 




-----------------------------------------

आष्टी(प्रतिनिधी)-माजीमंत्री सुरेश धस यांच्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात विविध विकास कामांचा धुमधडाका सुरू असून, सोमवार (दि.7)रोजी तालुक्यातील बेलगांव, मच्छिंद्रनाथ गड व गंगादेवी याठिकाणी सुमारे 45 कोटी 92 लक्ष रूपये विकासकामांचे भूमिपूजन माजीमंत्री सुरेश धस यांच्याहस्ते होणार आहे.

         आष्टी मतदारसंघात माजीमंत्री सुरेश धस यांच्या माध्यमातून शासन दरबारातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे.आज सोमवार (दि.7)रोजी बेलगांव येथे सकाळी 9 वा.12 कोटी 31 लक्ष ,वनवेवाडी,नागतळा दुपारी 12.30 वा.12 कोटी तर दुपारी 1.30 वा. मच्छिंद्रनाथ गड येथे 20 कोटी 35 लक्ष रूपये,आणि गंगादेवी येथे सायंकाळी 5 वा.1 कोटी 26 लक्ष असे एकूण 45 कोटी 92 लक्ष रूपायांचे वरील ठिकाणी  विविध विकास कामांचे भूमिपूजन माजीमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे.तरी वरील ठिकाणी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गावातील सरपंच, पदाधिकारी यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.