कुसुम अंतर्गत सोलर पंप योजनेसाठी MEDA-महाऊर्जा व महावितरण ने घ्यावी योग्य भूमिका... डॉ.उध्दव घोशीर

 *कुसुम अंतर्गत सोलर पंप योजनेसाठी MEDA-महाऊर्जा व महावितरण ने घ्यावी योग्य भूमिका... डॉ.उध्दव घोशीर* 




शासनाने MEDA महाऊर्जा मार्फत कुसुम अंतर्गत सोलर पंप शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याची घोषणा करत दिलासा दिला गेला परंतु MEDA-महाऊर्जा कडून काही सोलर पंप हे महावितरण कडे हस्तांतरीत करून या योजनेला जास्तीत जास्त गती मिळावी या उद्देशाने होती, पण तसे न होता शेतकऱ्यांना याचा फायदा न होता  त्याचा मनस्ताप होताना दिसत आहे. 

सुरवातीला सोलर पंप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पिळवणूक होत असे त्यानंतर शासनाने त्यांच्या पोर्टलवर माहिती देवून जागरुकता वाढवली खरी पण शेतकऱ्यांची पिळवणूक महाऊर्जा नेच वाढवली असे दिसून येत आहे.

ज्या वेळी शेतकऱ्याची सोलर पंप करीता निवड होते त्यानंतर त्याला स्वतःच्या शेतामध्ये जो पाण्याचा स्त्रोत त्याने दाखवला होता त्याचा सेल्फ सर्व्हे करायचा असतो. त्यानंतर निर्धारित पंपाची किंमत भरणा करावी लागते. व  व्हेंडर निवडावे लागते आणि त्यानंतरच्या विनाकारण जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना लुटण्यासाठी काही तरी मार्ग काढून शेतकऱ्यांकडून पैसे बळगवण्यासाठी महावितरण व आपण निवड केलेल्या कंपनी मार्फत वायरमन व  कंपनीच्या प्रतिनिधी कडून सर्व्हे करायचा पर्याय दिला गेला आहे. अशा या महावितरण आणि कंपनीच्यां सर्व्हे करीता शेतकऱ्यांना पैश्याची मागणी केली जात आहे. त्याशिवाय ते सर्व्हे करत नाहीत. 

वायरमन ने कंपनीच्या प्रतिनिधी चे नाव सांगायचे, कंपनी प्रतिनिधी ने वायरमन चे नाव सांगायचे, आलेच कशेतरी तर पेट्रोल-पाणी/चहापाणी या करीता पैश्याची मागणी करायची अन्यथा काही तरी कालावधी घालून शेतकऱ्यांना याचा मनस्ताप करायला भाग पाडायचं..

 

या सर्व त्रासाला सामोरे जाताना शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे अनुस्पर्श फाऊंडेशन मार्फत डॉ. उध्दव घोशीर हे MEDA- महा उर्जा व महावितरण ला निवेदन देऊन महावितरण व कंपनी मार्फत होणारा सर्व्हे वगळून सेल्फ सर्व्हे मध्येच ज्या अपेक्षित बाबी आहेत त्या आपण त्यात नमूद करून शेतकऱ्यांना द्याव्यात अशी सहकार्य करण्याची विनंती करत आहेत.



सध्याच्या काळात आपण पाहिले तर बँक  खाते उघडण्यासाठी व्हिडिओ मार्फत kYc करून खाते उघडून देता असेल तर आपणही याच धर्तीवर आपल्याला आवश्यक त्या बाबी व्हिडिओ मार्फत घेवुन केल्या तर  आपल्या कर्मचाऱ्यांना कामाचा ताणही होणार नाही आणि लाभार्थ्यांची ही पिळवणूक होणार नाही असे डॉ. उध्दव घोशीर यांनी म्हंटले आहे.. आजपर्यंत अनेकांनी शेतामध्ये कुसुम योजने अंतर्गत निवड झालेल्या सोलर पंपाच्या प्रक्रियेमध्ये ही जाचक असलेली अतिशय त्रासदायक व मानसिक स्थिती बिघडण्यास कारणीभूत असलेली ही गोष्ट असल्याचे अनुभवले आहे. तरी आपण सर्व माझ्या शेतकरी बांधवांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी.


 कोणीही सोलर पंप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जास्तीचे पैसे देवू नये.


 फसव्या लोकांपासून सावधान, कोणाची कसलीही आणि कुठेही यामध्ये मध्यस्थी नाही.


सोलर पंप मंजूरी करीता किंवा पंपाची निवड झाल्यावर ही कसलेही पैसे कोणाला देवू नये..


व्हेंडर निवडीसाठी पण काही लोकं कमिशन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्या पद्धतीने व्हेंडर निवड देऊन हिस्सा घेत आहेत


 महावितरण व कंपनी मार्फत होणाऱ्या सर्व्हे करीता कसलीही तडजोड करून पैसे देऊ नये.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.