*बदलत्या शेती क्षेत्राचे स्वरूप*
अमर हबीब
शेतीच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात मोठे बदल झाले आहेत.
1) शेतजमिनीचे लहान लहान तुकडे झाले आहेत. फक्त शेतीवर उपजीविका भागविणे आता अशक्य झाले आहे.
2) अत्यल्प भूधारक शेतकरी हा आता शेतमजुरी करू लागला आहे.
3) शेतकऱ्यांनी आपली मुले-मुली शेतीच्या बाहेर काढली आहेत.
4) भ्रष्ट नोकरदार, गुन्हेगारी जगतातील लोक व पुढाऱ्यांनी जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे.
4-क) या लोकांच्या खरेदीमुळे शेतजमिनीचे दर अनैसर्गिक रित्या वाढले आहेत.
4-ख) शेतीवर आयकर नसल्यामुळे ही गुंतवणूक त्यांना परवडते.
4- ग) त्यांच्याकडे शेतीबाह्य पैसा असल्यामुळे ते गुंतवणूक करू शकतात म्हणून त्यांची शेती हिरवी दिसते.
4-घ) शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नसल्यामुळे त्यातला तोटा ते अन्य मार्गाने भरून काढू शकतात.
5-ड) त्यांची शेती हिरवी असली तरी त्यांची मुले शेतीत दिसत नाहीत.तेही शेती बाह्य उत्पन्नात व्यस्त असतात.
5) शेतीत जगणे शक्य नसल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांची मुले रोजगाराच्या शोधात गाव सोडून गेली, त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात वयस्क लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.
6) शेतीच्या क्षेत्रात मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
6-क) शेतीच्या बाहेर मिळणारा मजुरीचा दर शेतीत मिळणाऱ्या दराच्या दुप्पट व त्या पेक्षा अधिक आहे.
6-ख) अनेक सरकारी योजनांमुळे मजुरांना शेतीत राबण्यात स्वारस्य राहिलेले नाही.
6-ग) जमिनीचे तुकडे इतके लहान झाले आहेत की आधुनिक तंत्राने शेती करणे परवडत नाही म्हणून शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या वेगाने होताना दिसत नाही. मजुरांच्या अभावाचा ताण कायम राहतो.
7) सरकारी योजनांचे लाभ मिळवता यावा यासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणात जमिनीच्या वाटण्या करून घेत आहेत.
8) ग्रामीण भागात लग्नाळू मुलांची संख्या वाढली आहे. शहरात रोजगार मिळत नाही, खेड्यात मजुरीचा दर परवडत नाही, शेतीतून पैसा निघत नाही म्हणून शेतीच्या चक्रव्यूहात अडकलेली ही मुले आहेत.
शेतीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे शेतकरीविरोधी 1) कमाल शेतजमीन धारणा कायदा 2) आवश्यक वस्तू कायदा 3) जमीन अधिग्रहण कायदा हे कायदे रद्द करणे. हे कायदे रद्द करायला सरकारी बजेट मध्ये एक पैश्याची सुद्धा तरतूद करावी लागणार नाही. सरकारची इच्छा झाली की एका फटक्यात हे कायदे सरकार रद्द करू शकते.
◆
धन्यवाद !
उत्तर द्याहटवाstay connected