शेख राबियाबी पटेल यांचे दुःखद निधन
आष्टी प्रतिनिधी -
तालुक्यातील साबलखेड येथील रहिवाशी स्वर्गीय शेख रमजान पटेल यांच्या पत्नी व पत्रकार प्रा.शेख निसार यांच्या आजी शेख रबियाबी रमजान पटेल वय ९८ (साबलखेड) यांचे रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6.20 वाजता दुःखद निधन झाले.
गेल्या अनेक दिवसापासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते . त्या साबलखेड येथील दिवंगत शेख रमजान पटेल यांच्या त्या सुविद्य पत्नी होत्या. तर आष्टी नगरपंचायत चे विद्यमान नगरसेविका शेख शमीम व शेख बाबुमिया सर यांच्या त्या आई होत्या. अत्यंत मनमिळाऊ शांत संयमी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्यावर साबलखेड येथील कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सूना, जावई,नातवंडे, असा परिवार आहे,
stay connected