CHH.SAMBHAJINAGAR | माजी खासदार इम्तियाज जलील समृद्धी महामार्गाने तिरंगा रॅली घेऊन मुंबईत धडकणार
-मुस्लिम समाजाविरोधात घडत असलेल्या निंदनीय घटनेंविरोधात, कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घड्डु नये आणि समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये याकरिता योग्य त्ती कार्यवाही मुख्यमंत्री व प्रशासनाने घेतली नाही म्हणून आम्ही तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आमचा निषेध नोंदवत आहोत असे इम्तियाज म्हणाले.महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील लोकांना मानसिक, आर्थिक त्रास देऊन सर्वांगिण विकासाच्या मुख्य प्रवाहापासुन दुर करावे तसेच त्यांचे जीवनमान खालवुन खच्चीकरण व्हावे या उद्देशाने विविध प्रकारचे षड्यंत्र रचुन अन्याय व अत्याचार केला जात असल्याचे आपल्या निदर्शनास येईल, विविध प्रसार माध्यमावर खुलेआम मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल आणि दोन समाजामध्ये मने कलुषित करून जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत असुन कोणत्याही प्रकारे फक्त समस्त मुस्लिम बांधवांचे धार्मिक भावना दुखावले जावे याकरिता निच कृत्य केले जात आहे. विशेष म्हणजे जातीय दंगल घडविण्याच्या इराद्याने व्यक्तव्य होत असल्याचा संशय आहे.
मुस्लिम समाजाविरोधात घडत असलेल्या निंदनीय घटनेविरोधात, कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना धडु नये आणि समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या कारणास्तव दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण पध्दतीने मुंबई पर्यंत ''तिरंगा रॅलीचे" आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सर्वसामान्य नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग असणार आहे.तिरंगा रॅलीतील प्रमुख मागण्या-रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि बसल्लम यांचा अपमान करण्याचा प्रयत्न, मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, आणि दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केल्याने त्यांच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात 60 हुन जास्त गुन्हे दाखल झाले असुन त्यांना तात्काळ अटक करावी.
दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणुनबुजुन प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण करत असलेला नितेश राणे यांच्या विरोधात कठोर कारवाई करुन तात्काळ अटक करण्यात यावी असे यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत
stay connected