कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार
दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
( पुणे प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. परदेशात कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. यावेळी चित्रपटाचे अनेकांनी कौतुक करत लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणिज्य दुत, पनामा, हेड ऑफ रीजन मेरीटाईम ऑथरिटी जिजस कॅंपोस, डॉ. अमजदखान, नाशिकच्या विभागीय आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना सन्मानित करण्यात आले. कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले दिवंगत आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर बनविण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे. मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई किएशन एंटरटेनमेंट निर्मित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत सांगोल्यातल्या तमाम जनतेने चित्रपट चित्रे करण्याच्या वेळी सहकार्य केलं विशेष सहकारी उल्हास धायगुडे पाटील यांचे लाभलं चित्रपटा. येत्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ ला संपूर्ण जगभर हिंदी आणि मराठी भाषेत कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वतःला जनसेवेत वाहून घेतलेल्या दिवंगत गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब या आदरणीय व्यक्तिमत्त्वावर हा चित्रपट असल्याने रसिक श्रोते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
stay connected