आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात सन २०२२ मध्ये पूरहानी दुरुस्ती, एफ.डी.आर., ए.एम.सी. पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसलंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करूनही सदर निकृष्ट कामाची विभागीय गुणनियंत्रक पथकामार्फत तपासणी न झाल्यामुळे निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे ॲड. नरसिंह जाधव यांनी दिली.
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सन २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत झालेल्या पूरहानी दुरुस्ती, एफ.डी.आर., ए.एम.सी. कामामध्ये सुमारे ५ कोटी रुपयांची कामे करण्यात आलेली आहेत. परंतु हि कामे नेमकी कोणत्या ठिकाणी केली गेली व या कामामध्ये कंत्राटदार कोण व या कामाबाबतची निविदा कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. याची माहिती नसल्याने जिल्ह्यासाठी नेमका किती निधी आला होता. याची माहिती जनतेला नाही तसेच पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारती साठी २ कोटी ५० लाख रुपया पैकी ८० ते ९० टक्के रक्कम अदा करूनही अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही तसेच वांजरा फाटा ते कुसलंब रस्ताही अपूर्ण स्थितीत आहे. व वरील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे कैलास दरेकर जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना मनसे बीड यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन lही सदरील कामाची विभागीय गुणनियंत्रक पथकामार्फत तपासणी करावी अशी मागणी केली. परंतु वेळोवेळी निविदने देऊनही अद्याप पर्यंत हि तपासणी न झाल्यामुळे व दोषीवर कारवाई न झाल्यामुळे कैलास दरेकर जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना मनसे बीड यांनी मा. उच्च नायायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहितार्थ याचिका स्टॅम्प क्र. २५०८३/२०२४ अॅड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे.
stay connected