राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनावरून राडा सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणा दोन तासानंतर प्रशिक्षण केंद्राच्या गेटला रिबीन लावून जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांनी केले उद्घाटन
-----------------------------------------------------
जामखेड - जामखेड पासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घटनावरून गुरुवारी मोठा राडा झाला. या केंद्राच्या चारही बाजूच्या रस्त्याला पोलिसांनी ब्रॅकेट लावून रस्ता अडवला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांनी अडवल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलिसांचे कडे तोडून प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर सर्वांना अडवण्यात आले. आ. रोहित पवार येताच जोरदार घोषणाबाजी होऊन प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी कडे केले होते. दोन तासानंतर प्रवेशद्वाराला रिबीन लावून पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर रात्री उशिरापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सभा झाली.
कुसडगाव (ता. जामखेड) येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्ण झाल्यामुळे आठ दिवसापूर्वी आ. रोहीत पवार यांनी
दि. 26 रोजी प्रशिक्षण केंद्रात उद्घटनाचा कार्यक्रम जाहीर करून मंडप उभारण्यासाठी तयारी चालू केली होती. सदर प्रशिक्षण केंद्राचे काम अद्याप पूर्ण झाले नसून पूर्णत्वाचा दाखला नाही म्हणून उद्घाटनास परवानगी नाकारण्यात वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. तर आ. रोहीत पवार यांनी सदर केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर मंडप उभारण्यात आला त्याला पण विरोध प्रशासनाने केला होता त्यामुळे गुरूवारी उद्घाटनाचा होणाऱ्या कार्यक्रमास मोठा राडा होईल असा अहवाल पोलिसांचा होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर राज्य राखीव पोलीस दल व पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात येऊन ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशिक्षण केंद्राकडे येण्यास वाहनाने कुसडगाव येथे आले असता एक कि.मी दूर वाहने अडवण्यात आले. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्रास्थळी मज्जाव करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी गृहमंत्री व आ. राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत बॅरिकेट्स तोडून पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या गेट पर्यंत येऊन ठिय्या आंदोलन सुरू करून भाषणबाजी चालू केली.
आ. रोहीत पवार येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांना खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणले पोलीसांचे कडे व प्रवेशद्वाराला वाहने आडवे लावल्यामुळे प्रशिक्षण केंद्रात जाता आले नाही.
सुमारे दोन अडीच तासानंतर आ. पवार यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराला रिबीन लावून पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय जाहीर केला. जामखेड पत्रकार संघचे अध्यक्ष व तेज वार्ता न्युजचे प्रतिनिधी नासीर पठाण यांना नागरिकांनी उचलून घेऊन प्रशिक्षण केंद्राचे फित कापुन उद्घाटन केले . उद्घाटन झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्रावरून सुरवातीपासूनच रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या श्रेयवाद सुरू आहे. काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडले होते.या केंद्राचे काम पूर्ण झाल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण होणार होते. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, ”राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून पडतात. कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या केंद्रास पोलीस बळाचा वापर केला ही घटना निंदनीय असल्याचा आरोप केला
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड
stay connected