आजी माजी आमदार यांना जनता कंटाळली
आमदारकीचा नवा पर्याय व मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले - सुशिला मोराळे
आष्टी प्रतिनिधी -
आष्टी मतदारसंघात ४० वर्षापासून आष्टी मतदार संघाचे राजकारण धोंडे, धस, दरेकर, आजबे या चार घरांच्या भोवतीच असून, आता जनता यांना त्रासली आहे. त्यासाठी मी या मतदारसंघाची सून आणि आमदारकीचा नवा पर्याय व मतदारसंघाच्या विकासासाठी येणा-या विधानसभा निवडणुक रिंगणात उतरुन खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन सुशिला मोराळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुशीला मोराळे यांनी जनसंवाद दौरा सुरु केला आहे. त्या अनुषंगाने रविवार दि.९ सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यात आले असता सायंकाळी ६ वाजता आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मोराळे बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, गेल्या ४५ वर्षात या मतदारसंघाने २० वर्ष भिमराव धोंडे, १५ वर्ष सुरेश धस व पाच-पाच वर्ष दरेकर आणि आजचे ह्यांनी आमदारकी भोगली आहे. आता याचारही नेत्यांना मतदार संघातील जनता त्रासली आहे. आत्ता पर्यंत मतदार संघात आमदारकीचा नवा पर्याय नव्हता आता मी खा. शरद पवार यांच्या आदेशाने आणि साथीने आष्टी मतदारसंघाची सून या नात्याने निवडणूक लढविणार असून विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.


stay connected