आष्टीच्या तहसीलदार म्हणून आता वैशाली पाटील

 आष्टीच्या तहसीलदार म्हणून आता वैशाली पाटील



-------------

कडा / वार्ताहर 

------------

मागील एक महिन्यापासून रिक्त असलेल्या आष्टीच्या तहसीलदार पदाचा पदभार अखेर नवनियुक्त तहसीलदार वैशाली नालगोंडा पाटील यांनी स्वीकारला आहे .


आष्टी तहसील कार्यालयात यापूर्वी कार्यरत असलेले तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची प्रशासकीय बदली झाल्यावर त्यांच्या जागी नागपूर येथील वैशाली नालगोंडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, महिना उलटूनही त्यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबली होती. अखेर महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर तहसीलदार पाटील यांनी आष्टीच्या तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला. याप्रसंगी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे पाटील यांनी बोलताना सांगितले.



------%%-----

प्रलंबित प्रकरणे,
विश्वास संपदान आव्हान ? 

------------

आष्टीच्या तहसीलदार म्हणून काम करत असताना पाटील यांना महसूल विभागातील दैनंदिन कामांसह रेशनिंग वाटप, अवैध वाळू उपसा, गौण खनिज उत्खनन, प्रलंबित प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणे, या कामांवर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, याशिवाय, प्रामुख्याने आजी-माजी आमदारांचा समतोल राखत त्यांचा विश्वास संपदा करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

-----%%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.