श्री अमोलक ऋषी म.सा यांच्या८८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री अमोलक ऋषी म.सा यांच्या८८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन



 अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रात:स्मरणीय, बालब्रम्हचारी प.पू श्री अमोलक ऋषी म.सा यांच्या८८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  संस्थेचे शताब्दी वर्ष,अहिंसा रत्न पुरस्कार,भव्य रक्तदान शिबीर अशा त्रिवेणी संगम या पुण्यतिथी घडून आलेला आहे.

कडा शहरात चार्तुमासानिमित्त विराजित मधुर व्याख्यानी प.पू विश्वदर्शनाजी म.सा  व  सेवाभावी श्री.प.पू.कीर्तिसुधाजी म.सा यांच्या उपस्थितीत हा  पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे.

यानिमित्ताने कडा शहरातील प्राण्यांना जीवनदान देणारे, पशुपक्ष्यांच्या संकटसमयी धावून जाणारे, नि:स्वार्थ भावनेने जीवाची पर्वा न करता पशुपक्ष्याचे प्राण वाचवणारे,करोना काळात मानवजातीला वाचवण्यासाठी योगासनाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देणारे,अहिंसावादी, 'जिओ और जीने दो' हा मूलमंत्र जपणारे  जैन धर्मातील अहिंसा तत्वाचे पालन करणारे कडा शहरातील आगळेवेगळे व्यक्तीमत्व श्रीमान नितीनजी आळकुटे यांना प.पू.अमोलक ऋषीजी .म.सा.यांच्या पुण्यतिथी व शताब्दिपूर्ती वर्षानिमित्ताने 'अहिंसा रत्न" पुरस्कार मधुर व्याख्यानी प.पू.विश्वदर्शनाजी म.सा व सेवाभावी श्री. प.पू कीर्तिसुधाजी म.सा यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 

तसेच यावेळी  तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.


 कडा व परिसरातील रक्तदात्यांना आवाहन करण्यात येत आहे, दि १३ सप्टेंबर२०२४ रोजी सकाळी ठिक१०वाजल्यापासून गांधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळणार आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे तरी मोठ्या संख्येने रक्तदान करावे.

 

 या कार्यक्रमानिमित्ताने  दानवीर श्री.गोकुळदासजी मेहेर यांच्या वतीने गौतमी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे 

प.पू.अमोलक ऋषी .म.सा.यांचा पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.