शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठकसन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने

 *शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक*


*

सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने*

सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन असे संबोधन लाभलेल्या सन्मान मानधन योजनेत अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी अर्जात राहिलेल्या त्रुटींच्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करावी.दि.२५ व २६ सप्टेंबर रोजी समितीची बैठक होत असून या बैठकीत अर्जांवर विचार होईल.यासंदर्भात आपण संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाची विनंती करु शकता.

धन्यवाद.

आपला,

-राजा माने.

-संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.

-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.

-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

(नम्र आवाहन: पत्रकार पेन्शन योजना निधी आणि राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्याच्या मागणीसाठी आपल्या भागातील आमदार, खासदारांना साकडं घाला आणि मा.मुख्यमंत्र्यांना तसे ई-मेल करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.