MUMBAI | चुकीच्या इंजेक्शनमुळे महिला पोलिसाचा मृत्यू

 MUMBAI | चुकीच्या इंजेक्शनमुळे महिला पोलिसाचा मृत्यू






 - चुकीच्या इंजेक्शनमुळे एका २८ वर्षांच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला, ऍक्सिस रुग्णालयात घडली. गौरी सुभाष पाटील असे या शिपाई महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे. या मृत्यूमागे रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे.



२०१७ बॅचची गौरी पाटील ही कांदिवलील समतानगर, सरोवर टॉवरच्या पन्हाळा सोसायटी सी/२/३०३ मध्ये राहत होती. सध्या ती मरोळ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. कानात दुखत -असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल, वास्तू लेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या


ऍक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला ऑपरेशनपूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तेथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.



गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य' नियंत्रण कक्षातून आंबोली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चुकीचे- इंजेक्शन दिल्यामुळेच गौरी पाटील हिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तिचा मृतदेह कूपर रुग्णालयातः पाठवण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

Janata


या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.. गौरीच्या मृत्यूची माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली. तिच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.