महिलांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद, सौ. शितल भोसले यांनी ११ हजाराची तर सौ. स्नेहल होले यांनी जिंकली ७५०० रुपयांची पैठणी
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथे कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. शितल सतिष भोसले यांनी ११ हजार रुपयांची बांगडी मोर पैठणी जिंकली तर सौ. स्नेहल संदिप होले यांनी ७५०० रुपयांची काली चंद्रकला पैठणी पटकावली आणि सौ. मोनाली किरण शिंदे यांनी ५ हजार रुपयांची पेशवाई पैठणी पटकावली. खेळ पैठणीचा कार्यक्रमास आष्टी तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या उपस्थित महिलांमध्ये प्रचंड होता कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्षात २०० ते २५० महिलांनी सहभाग नोंदवला.
याबाबत अधिक माहिती अशी की ,आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनांमध्ये स्वागत अध्यक्ष डॉ. अजयदादा धोंडे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. दमयंतीताई धोंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी सौ.अक्षदा अजय धोंडे, सौ. सविता राजेश धोंडे उपस्थित होत्या. सिने पत्रकार भगवान राऊत यांच्या संकल्पनेतून खास महिला व माता-भगिनींसाठी बी. आर. इव्हेंट्स प्रस्तुत खेळ पैठणीचा, सोहळा आनंदाचा हा निवेदक उद्धव के. पी. यांनी सादर केलेला धमाल मनोरंजक कार्यक्रम झाला.महिलांसाठी मनोरंजक खेळ, गप्पा, गाणी, उखाणे, नृत्य, नाट्य, संगीता बरोबरच मनोरंजनातून प्रबोधन करणारे किस्से व कार्यक्रम सादर करण्यात आले. खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. सुनिता सुद्रुक यांनी ज्युसर हे बक्षिस पटकावले, डॉ. सौ. स्मिता एकनाथ हजारे यांनी कुरडया करण्याचा सोर्या मिळविला, सौ. अर्चना शेवाळे यांना ड्राय फ्रुट सेट मिळाला,सौ. वैशाली सुभाष जाधव व मिनाज अफजल शेख यांना प्रत्येकी पोळी ठेवण्याचा डबा हे बक्षिस मिळाले. सौ. उषा भारत केरूळकर यांना लेमन सेट व सौ. शेख भाभी यांना पर्स हे बक्षिस मिळाले. खेळ पैठणीच्या संपूर्ण कार्यक्रमाचा माजी आमदार भीमराव धोंडे, जेष्ठ नेते विठ्ठलराव बनसोडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, , अभयराजे धोंडे, दिलीपराव काळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी . राऊत, प्राचार्य श्रीराम आरसुळ, बाबु कदम तसेच आष्टीतील पत्रकार बांधव तसेच महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आस्वाद घेतला. भाजपाचे आष्टी शहराध्यक्ष बाबु कदम व कु. भक्ती गणेश गिरी या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या जीवनावर कविता सादर करून उपस्थितीने जिंकली. दोघांनाही उपस्थितांनी रोख स्वरूपात बक्षिस देऊन कौतुक केले.
stay connected