BULDHANA | अशा नोटीसींची मला सवय आहे, मी वर्ष बंगल्यावर जाणारच - रविकांत तुपकर
बुलठाणा- शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 23 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला..यापूर्वी देखील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलन असो की मंत्रालयावर ताबा घेण्याचे आंदोलन असो, रविकांत तुपकर इशारा दिल्यानंतर आंदोलन करतातच, हा इतिहास आहे.. यापूर्वी देखील हजारों शेतकऱ्यांना घेऊन तुकरांनी मुंबईत धडक दिलेली आहे. त्यामुळे तुपकरांच्या या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी 168 अंतर्गत तुपकरांना बजावली आहे.. तर आजवर अशा हजारो नोटीस आलेल्या आहेत. नोटीसींना आणि पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहे.. त्यामुळे कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही 'वर्षा' बंगल्यावर जाणारच, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.
stay connected