अंभोरा पोलीस सतर्क ! घरफोड्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती

 अंभोरा पोलीस सतर्क ! घरफोड्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती



-------------------

गावागावांना भेटी; ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी- सपोनि साळवे

------------------------

कडा / वार्ताहर

---------------

घराला कुलूप लावून नागरिक शेतात व इतरत्र कामानिमित्त घराबाहेर पडत असल्यामुळे घरफोडीच्या घटनांत वाढ होऊ लागल्यामुळे या चो-यांना आळा घालण्यासाठी अंभोरा पोलीस अॅक्शन मोडवर आले असून, या पोलिसांकडून गावागावांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरीकांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी केले आहे.


                                                                                                                   आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये घरफोडी, चोरीच्या घटना निदर्शनास येऊ लागल्या आहेत. त्या अनुषंगाने अंभोरा अॅक्शन मोडवर आले असून, परिसरातील घरफोड्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने या अंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत असणा-या विविध गावांना पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांना घरफोडी, चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत काही सुचना, घ्यावयाची काळजी, या संदर्भात मार्गदर्शन करुन सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सपोनि मंगेश साळवे, पोउपनि देवीदास सातव, पोह संतोष क्षीरसागर, भरत माने, बाबुराव तांदळे, बाबासाहेब गर्जे, मनोज खंडागळे, दत्ता टकले, अमोल ढवळे, पोकाॅ शिवदास केदार, अमोल सिरसाठ, शरद पोकळे, सतीष पैठणे, सुदाम पोकळे इत्यादी पोलिस अधिकारी, कर्मचारी या जनजागृती मोहीमेत सहभागी झालेले आहेत. 

-------%%--------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.