आज आष्टी येथे भारतातील प्रसिद्ध
खानकाहे कादरियाचे सज्जादानशिन हजरत आतिफ मिया यांचे आगमन
आष्टी/ प्रतिनिधी
भारतातील 800 वर्ष प्राचीन खानकाह
खानकाहे कादरिया बदायूं शरीफ ( यू.पी.) चे
सज्जादा नशिन व भारतातील प्रसिद्ध इस्लामिक विद्वान व तत्ववेते अल्लामा व मौलाना हज़रत अब्दुल गनी मोहम्मद आतिफ मियाँ कादरी उस्मानी अजहरी बदायूंनी हे बुधवार 28 ऑगस्ट रोजी मस्जिद व दर्गा हजरत फक्त शाह बुखारी ( रहे. ) आष्टी जि.
बीड येथे मगरिबच्या नमाज़ नंतर 7:30 वा. उपस्थित राहुल ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जीवन चरित्रवर प्रवचन देणार आहे.
बीड जिल्ह्याच्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये हज़रत साहेब 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळी हाजी सय्यद रिज़वान कॉन्ट्रॅक्टर ज़म ज़म कॉलोनी बीड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना भेटणार असून त्यांच्याशी हितगुज करणार आहेत.
मा.हजरत साहेब आष्टी येथे शेख अब्दुल बाकी कादरी यांच्या निवासस्थान "कादरी व्हिला" येथे मुक्कामास राहणार असून दिनांक बुधवार 28 रोजी सकाळी 11 ते 12 व संध्याकाळी साडेपाच ते सात यादरम्यान त्यांच्या अनुष्ठान भेटीचा लाभ आष्टीच्या रहिवाशांना घेता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी व्हाट्सअप क्रमांक 94 22 59 12 13 या क्रमांकावर संपर्क साधावा .
stay connected