मा. आ. भिमराव धोंडे यांची शिरापुर येथे बैलगाडीतून मिरवणूक तर धानोरा येथे जेसीबीतुन फुलांची उधळण
आष्टी प्रतिनिधी
जनसंपर्क अभियान दौऱ्यांची निमित्ताने आष्टी तालुक्यातील शिरापुर येथे आकर्षक रित्या सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक तर धानोरा येथे जेसीबीतुन फुलांची उधळण करीत स्वागत आले, पिंपरखेड येथे ट्रॅक्टर चालवत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. तर दादेगाव येथे मा. आ. भिमराव धोंडे यांची वाजतगाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच डोंगरगण येथेही फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये फटाके व तोफांची सलामी देत भिमराव धोंडे यांचे धानोरा गटात जोरदार स्वागत करण्यात आले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी शुक्रवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील धानोरा, दादेगाव व परिसरातील वाड्या वस्त्यांचा दौरा केला. धानोरा येथील तिरमल वस्ती व गव्हाणे वस्ती, साबलखेड, शिरापुर, चिंचोली एकशिंगे,पिंपरखेड,कन्हेरवाडी, भोजेवाडी, कोकरे वाडी, कोल्हे वाडी, देवकाते वाघमोडे वस्ती, महादेव वाडी, सुरनरवाडी, भिल्ल वस्ती, दादेगाव कॅप, दादेगाव, डोंगरगण या गावाचा दौरा केला.
Vdo पहा
विविध ठिकाणी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काम करुन ठेवले, मी विधानसभा सदस्य असताना मतदारसंघात रस्ते विकास , सिंचनाची कामे करुन ठेवली आहे तर इतरांनी मतदारसंघातील जनतेकरिता भविष्यासाठी काय केले असा सवाल उपस्थित करीत उर्वरित विकासकामे करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केले. शिरापुर येथे बोलताना सांगितले की, बऱ्याच दिवसानंतर मला बैलगाडीत बसण्याचा योग आला.
साबलखेड येथे शाळेची इमारत चांगली आहे तेथे आय. टी. आय. सुरू करु असे सांगितले. धानोरा येथील कै. शेख मैनुद्दीन व कै. भगवान एकशिंगे हे कार्यकर्ते कायम स्मरणात राहतील असे सांगितले. दौऱ्याच्या निमित्ताने हौसराव जगताप, अब्दुल सय्यद, दिनकर गव्हाणे, शहाजी मारुती चव्हाण यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, माजी सरपंच झुंबर चव्हाण, तुकाराम चव्हाण,पोपट जाधवर, व इतर कार्यकर्ते सोबत होते. भोजेवाडी येथील शिवाजी पालवे व हिवरा येथील अपेक्षा सुदाम चव्हाण यांची पोलीस दलात निवड झाली त्याबद्दल तिचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणी लाडक्या बहिणीनी भिमराव धोंडे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. पिंपरखेड येथे पारधी समाजाकडून फुलांची उधळण करीत भिमराव धोंडे यांचे स्वागत करण्यात आले. साबलखेड येथील साबळे वस्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वेगवेगळ्या ठिकाणी युवा नेते अजयदादा धोंडे,आदर्श शिक्षक नवनाथ गाडे, उपप्राचार्य भास्कर चव्हाण, उपसरपंच चांगदेव एकशिंगे, विकास एकशिंगे, माजी सरपंच भगवान काळे, सेवानिवृत्त स.पो.नि.गोरख शेळके, नवनाथ पाटील, नामदेव शेळके, गंगाधर बोराटे, सावनकुमार तागड, शिवाजी गोफणे, संदीप नागरगोजे, सुभाष नागरगोजे यांनी मनोगत व्यक्त केले.
पिंपरखेड येथील गर्जे वस्तीवरील महादेव गर्जे यांचे निधन झाले होते त्यांच्या कुटुंबियाची सांत्वन करण्यांत आले. ठिकठिकाणी माजी सभापती विजयकुमार बांदल, सरपंच सोमनाथ गायकवाड, माजी सरपंच झुंबर चव्हाण, नवनाथ गाडे, माजी सरपंच डिगांबर साबळे, शिरीष थोरवे, सोपान गाडे, सरपंच माऊली वाघ, बाबासाहेब बळे, गजानन देसाई, आबासाहेब जाधव, गोरख गाडे, एकनाथ जाधव, बजरंग देसाई, भाऊसाहेब साबळे, नारायण साबळे, बाबुराव दातीर, किरण तागड, विष्णूपंत चौरे, बाबुराव तागड, नाथा वाघमोडे, गहिनीनाथ तागड, उपसरपंच अनील गायकवाड, सरपंच सुभाष शेळके, भाऊसाहेब पोटे, उपसरपंच राम शेळके, बाजीराव गोफणे, आनंदराव कापरे, बापुराव दातीर, नरहरी तागड, बंडू तागड, सरपंच हनुमंत आडागळे, सिताराम झांजे, उपसरपंच चांगदेव एकशिंगे,दत्तू शेळके , माजी सरपंच बाबासाहेब एकशिंगे,आजिनाथ कौचाळे, सरपंच भाऊसाहेब कोकरे, दत्तोबा शिंद, कृष्णा देवा, दिपक गोल्हार, भगवान कोकरे, लक्ष्मण कोकरे, माणिकराव कोकरे, विठोबा विधाते, गोपिनाथराव विधाते,बालाजी थोरवे,माजी सरपंच बिभिषण कवडे,केशव महाराज , भाऊसाहेब लांडगे, दादा गवळी, बापुराव धारक, फारुकभाई,पै. अनिस सय्यद, माजी उपसरपंच सदाशिव कन्हेरकर, अभय गर्जै, उपसरपंच परमेश्वर कर्डिले,मच्छिंद्र शेळके, दादासाहेब शेळके, दादासाहेब जगताप भिमराव चव्हाण, संतोष चव्हाण, तुकाराम चव्हाण, ज्ञानदेव चव्हाण, दिनकर गव्हाणे, गोरख ओव्हाळ, राजेंद्र ओव्हाळ, भारत चव्हाण, पंढरीनाथ ओव्हाळ , किशोर ओव्हाळ,धुळाजी लकडे, संजय पारखे, संजय काळे, कुंडलिक कोल्हे, सिताराम वाघुले, नामदेव रणसिंग, बबन सुरनर, नामदेव बडे, उपसरपंच भरत विधाते ,बबनराव जाधवर , आण्णासाहेब विधाते, नेहरु वाघुले,संजय बंडाले, बबन वाघुले, दिपक बंडाले, मुरलीधर मुळे, उस्मान भाई व इतर कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास उपस्थित होते.
stay connected