बीडसांगवी येथील महादेव नदीला महा भयंकर पुर......
कडा ते कुसळंब बीड सांगवी येथील महादेव नदी वर मोठ्या पुलाची आवश्यकता - सरपंच करांडे..........
विकास साळवे बीडसांगवी आष्टी
आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथे यावर्षी सुरुवातीला जुन महिन्यात पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने खरीप हंगामात वेळेवर पेरण्या झाल्या आहेत पिकं चांगले अवस्थेत असताना मागील काही दिवसांपासून संततधार होणाऱ्या हंगामात ऐन काढणीस आलेल्या उडीद मूग बाजरी ला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे . कडा ते कुसळंब मार्गावर बीड सांगवी जवळ असलेल्या महादेव नदी वर कमी उंचीचा पुल असल्याने पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर रहदारी बंद होते . त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय बीड सांगवी येथील विद्यार्थ्यांना जिवघेणी कसरत करावी लागते . नदीला पुर आल्यानंतर बबलु ढोबळे काका नरवडे महादेव चव्हाण संदिप जाधव संदीप चव्हाण नाना करांडे पै ऋषिकेश करांडे सुनील आगवान तरुणांनी मानवी साखळी तयार करुन पुल पार करून प्रवाशांची मदत केली आहे . विद्यार्थ्यांना कसरत करुन रोज शाळेला जावं लागतं . या नदीवर मोठा पूल उभारावा जेणेकरुन दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात अडचण निर्माण होणार नाही .कडा ते कुसळंब मार्गावर बीड सांगवी येथे महादेव नदी वर मोठ्या पुलाची मागणी सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे विकास तात्या साळवे बबनराव करांडे संतोष आबा करांडे संदिप कराडे सुभाष तात्या गणगे विजय करांडे पप्पु ढोबळे दादासाहेब साळवे शहादेव चव्हाण कृष्णा पाणतावणे यांनी केली आहे .
stay connected