कुंबेफळ येथील अखंड हरिनाम सप्ताहची मंगळवारी होणार सांगता

 कुंबेफळ येथील अखंड हरिनाम सप्ताहची मंगळवारी होणार सांगता



आष्टी ( प्रतिनिधी ) -

आष्टी तालुक्यातील कुंबेफळ  येथे- सालाबाद प्रमाणे यंदाही गोकुळ अष्टमीनिमित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दि २० ऑगस्ट रोजी झाली तर सप्ताहाची सांगता मंगळवार दि,27.8.2024 रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांच्या किर्तनाने होणार आहे मंगळवारी  सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत हभप प्रकाश साठे महाराज यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल.तरी  परिसरातील व पंचक्रोशीतील,सर्व भाविक भक्तांनी व इतर सर्व धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील भावीकांनी  कुंबेफळ येथील सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनाचा व‌ महाप्रसादाचा  लाभ  घ्यावा. असे आवाहन सर्व कुंबेफळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.