*मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने सारखी संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना सुलभ व सोपी करा - अमर वाळके*
- आपण मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालु करून महिलांचे हित जोपासले आहे आपण केलेली या योजनेचा अनेक महिलांना चांगला फायदा होणार आहे.या योजनेची मंजूर करण्याची पद्धत आपण नारी शक्ती ऍप द्वारे सुलभ केली.व कित्येक महिलांना स्वतः अर्ज करायला जमले कुठे जाण्याची गरज भासली नाही.आपण राज्यमंत्री मंडाळात खूप चांगले चांगले निर्णय घेत आहात. कित्येक लोककल्याणकारी योजना आणत आहात.याचा जनतेला खुप फायदा होत आहे.विरोधकांनी सुद्धा चांगल्याला चांगले आणि वाइटाला वाईट म्हणण्याची मानसिकता दाखवली पाहिजे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला नाव न ठेवता सत्ताधारी व विरोधक यांनी ती टिकेल कशी व महिलांना फायदा होईल याच्या विचारधीन असले पाहिजे.आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जसा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीणीचा घेतला अर्ज करण्याची पद्धत सुलभ केली तशीच आपण निराधारांची संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेची पद्धत सुलभ करावी.या योजना मंजुर करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत टाईमावर मिटिंग होत नाहीत.एक तर वर्षा मधे दोनदाच मिटिंग होतात.कधी कधी त्यापण होत नाही अर्ज तसेच धुळ खात पडतात.आपण सर्वांनी मंत्रीमंडळात निर्णय जसा मुख्यमंत्री लाडकी बहीणीसाठी घेतला तसाच निराधारांसाठी घ्यावा व ही योजना अधिक सुलभ व सोपी करावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अमर वाळके यांनी करत आहेत.
stay connected