मनोज जरांगे पाटील वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह येथे वृक्षारोपण
आष्टी -
महाराष्ट्र शासनाच्या"एक पेड मा के नाम"या योजनेअंतर्गत मराठा सेवा संघाचे राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 01ऑगस्ट 2024 रोजी सदरचे वृक्षारोपण करण्यात आले. आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयाचे अध्यक्ष इंजि. किशोर नाना हंबर्डे, युवा नेते अमोल राजे तरटे, प्राचार्य सोपानराव निंभोरे, प्राध्यापक सखाराम वांढरे सर, इंजि. तानाजी जंजिरे, प्राचार्य शशिकांत कन्हेरे, ॲड. सिताराम पोकळे यांच्या शुभहस्ते सदरचे वृक्षारोपण करण्यात आले.
आष्टी येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाचे प्रमुख अधिकारी आरसेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व धानोरा येथील रोपवाटिकेचे प्रमुख वनपाल अमोल घोडके यांच्या सहकार्याने वृक्षारोपणासाठी रोपे मिळाले आहेत. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी बापू जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी वस्तीगृह परिसरामध्ये शिल्लक जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवश्री लक्ष्मण रेडेकर यांनी दिली.
stay connected