आष्टी शहरात दोन शाळकरी मुलींची छेड, पालकांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आष्टी प्रतिनिधी-
शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा सुटल्यानंतर रस्त्याच्या कडेला आडवूण शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदरील प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला (मुलींची) शाळा असून या ठिकाणी शहरासह तालुक्यातील हजारो मुली शिक्षण घेत आहेत. दरम्यान शाळा सुटल्यानंतर शुक्रवार दि२३रोजी सायंकाळी
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींना अडवून त्यांची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. सदरील मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पुन्हा शाळेत जाऊन घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी संबंधित मुलींच्या पालकांना बोलून पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण हकीगत सांगतली. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध पीडित मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेतील आरोपी खडकत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात प्रकार कैद झाला असल्याचे बोलले जात आहे.
stay connected