पैशाच्या वादातून खरडगव्हाणमध्ये कुटुंबीयांना काठीने मारहाण

 पैशाच्या वादातून खरडगव्हाणमध्ये कुटुंबीयांना काठीने मारहाण

--------------

तिघेजण जखमी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

----------------

कडा /वार्ताहर

-------------



तालुक्यातील खरडगव्हाण येथे पैशाच्या वादातून दोघांनी शेतात काम करीत असलेल्या नरवडे कुटुंबाला काठ्याने हल्ला करीत जबर मारहाण केली. त्या दोन महिलांच्या गळ्यातील दागिने तोडून नेले. त्यात तिघे जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी (दि.22) दुपारी घडली. याबाबत अंभोरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष पोपट वाडेकर, विष्णू सुभाष वाडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लंकाबाई प्रल्हाद नरवडे (रा. खरडगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. आम्ही घराजवळील शेतामध्ये मुगाच्या शेंगा तोडण्याचे काम करीत होतो. यावेळी पती प्रल्हाद नरवडे यांच्या मोबाईलवर संतोष वाडेकर याचा फोन आला. तो म्हणाला, आमचे कांद्याचे पैसे देऊन टाक. त्यावर पती प्रल्हाद नरवडे म्हणाले, आपला पैशाचा व्यवहार मिटला आहे. त्यावर संतोष वाडेकर शिवीगाळ करू लागला. त्यानंतर पती प्रल्हाद नरवडे यांनी फोन ठेवला. दरम्यान, काळी वेळात संतोष वाडेकर व विष्णू वाडेकर आमच्या शेतात आले. तुला हाताखालून काढतो असे म्हणून पती प्रल्हाद नरवडे यांच्यावर काठीने हल्ला केला. सोडविण्यासाठी मधी आलेल्या जाऊबाईला त्यांनी ढकलून दिले. पती प्रल्हाद व मला जबर मारहाण केली. त्यावेळी संतोष वाडेकर याने माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. तर, नंनद पुष्पा जेधे सोडविण्यासाठी मधी आल्या असता त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत विष्णू वाडेकर याने हिसकावली. माझ्या मुलाचा गळा दाबून त्याला मारहाण केली. तर, सासू सोनाबाई यांनाही मारहाण केली. आम्हाला जिवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. आम्ही सर्वजण घाबरल्याने पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. याप्रकरणी रात्री उशिरा अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मनोज खंडागळे करीत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.