सुरेश धस यांच्या जनसंवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 सुरेश धस यांच्या जनसंवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद






आष्टी (प्रतिनिधी)

विधानसभा सदस्य नसताना देखील मी विधान परिषदेत विधानसभेप्रमाणे काम केले आहे.मी लोकसभेलाच माझ्या कार्यकर्त्याला आणि मला मानणाऱ्या लोकांना सांगितले होते की मला कवड्यात कवड्या मिसळायच्या नाहीत.

माझा कार्यकर्ता मी सत्तेत असो अथवा नसो परंतु तो कधीच कोणाच्या दारात गेला नाही हे अभिमानाने मला सांगत त्यांचे आभार मानावे वाटतात.असे जीवाचे माणसे गोळा करण्यासाठी रात्रंदिवस त्यांच्या सेवेत राहुन काम आणि जनतेच्या सेवेत राहावे लागते रात्री अपरात्री जरी दवाखाना,अपघात इतर कोणत्याही बाबीसाठी फोन आला तर मी आणि माझं धस कुटुंबीय तेवढेच तत्पर असल्यानेच एका मॅसेजवर जनता गोळा होते. 

गेल्या पाच वर्षात आता निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने काही राजकीय पुढाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर गाव भेटी दौरे सुरू केले आहेत. कोरोना काळात ३३ विलगीकरण केंद्र व १३ कोविड सेंटर चालवत अनेकांना जीवदान  देण्याचे काम माझ्या हातून झाले आहे आणि त्या काळात रात्रंदिवस मी जनतेसाठी काम जनसेवा करण्याचं काम करत होत.कोरोना काळात औषध पेक्षा आधार देण्याची जनतेला आवश्यकता होती ते काम मी प्रामाणिकपणे केले.कोरोना काळात ३३ ठिकाणी विलगीकरण १३ हॉस्पिटल चालवले जीव वाचवले त्यावेळेस मतदार संघाचे आमदार व माजी आमदार कुठं होते ,,? असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला. यावेळी लोणी येथील मेळाव्यास जि.प. सदस्य दतोबा वाडेकर,भाजपा जेष्ठ नेते रमेश ढगे, जयशिंग गव्हाणे,माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे,सरपंच संजय रक्ताटे,उद्धव मोढवे पाटील, हनुमंत जंजिरे,अनिल गलांडे,शिवा पाटील वाळके,रामदास शेंडगे,बबन परकाळे, मनोज थोरवे, मयूर मोंढवे,नामदेव सायंबर,कृष्णा काकडे, बाबा मुठे,सरपंच सोमनाथ वाडेकर, राहुल सुरवसे,भवर सर,योगेश शेळके, राजु खुरांगे, दत्ता शेळके, सरपंच विकास अमृते, तर दौलावडगाव येथील मेळाव्यास

व्यासपीठावर माजी सभापती अशोक इथापे,सिद्धेश्वर ढोले,माजी सरपंच महेबूब शेख,विठ्ठल नाना अकोलकर,कारखेल सरपंच रघुशेठ घुले,केळ सरपंच सचिन दळवी, दौला वडगाव उपसरपंच बिबीशन दहातोंडे,वहाब पटेल,चेअरमन भास्कर थोरात,माजी सरपंच सचिन घुले,माजी सरपंच अशोक दहातोंडे, सालेवडगाव सरपंच महेश कराळे,माजी सरपंच शिवाजी थोरात, सावरगाव मायंबा येथील मेळाव्यास भाजपा तालुकाध्यक्ष अँड.साहेबराव म्हस्के,अध्यक्ष दादासाहेब चितळे,बाबासाहेब म्हस्के,ताठे पाटील साहेब, सरपंच पंढरीनाथ चंदनशिव,सरपंच पती मल्हारी शिंदे, पिंपरी (घाटा) सरपंच मोहन आमटे,सरपंच शेडाळा जावेद शेख, बुवासाहेब शेकडे, उपसरपंच गणेश वायभासे, शाम आबा तळेकर, माजी जि. प.सदस्य रावसाहेब शिरसाठ,माजी उपसभापती रमेश तांदळे,आदींसह पंचक्रोशीतील नागरिक,कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.