आष्टीत गाईचं अनोख डोहाळे जेवण : किर्तन,मंडप थाटामाटात गाईच डोहाळ जेवण परिसरात चर्चेचा विषय

 आष्टीत गाईचं अनोख डोहाळे जेवण : किर्तन,मंडप थाटामाटात गाईच डोहाळ जेवण परिसरात चर्चेचा विषय 












आष्टी प्रतिनिधी - शहरातील अशोक सायकड या शेतकऱ्याने आपल्या गायीचे डोहाळे कार्यक्रम लग्नासारखे केले. यावेळी शेकडो लोकांच्या पगंती बसल्या. गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले महिलांनी गाईची ओटी भरली. यानिमित्ताने मंडप व किर्तनाचे आयोजन करण्यात आले सगळ्या पाहुण्यांना जेवण घालून महिलांचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो अशाच पद्धतीने रितीरिवाज प्रमाणे गाईचे पुजन करण्यात आले.

लाडक्या गायीचं डोहाळ जेवण धूमधडाक्यात केलं आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाची आष्टी तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.


आई होणं ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं गोड कौतुक करत असतात. पण आष्टी शहरातील एका शेतकऱ्याने लाडक्या गायीचं डोहाळ जेवण आज दि.११ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता धूमधडाक्यात केलं आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे.ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. " हौसेला मोल नसते," म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर, खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. अशाच एक आष्टी येथील हौशी शेतकरी अशोक सायकड यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. तसेच महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, अशाच प्रकारे सर्व रितीरिवाज पार पडले.मंडप घालण्यात आला,गायीला सजवून ओवाळण्यात आले. सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झाले. गायीला हिरवा चारा पंचपकवानाचे जेवण घालण्यात आले . आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता. नंतर ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. हौसी शेतकरी अशोक नाना सायकड,सोमीनाथ अशोक सायकड, तुकाराम अशोक सायकड या सायकड कुटुंबीयांच्या गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

---------

गाईला सजवले


डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले. गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला. तसेच आनंदीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रम संपन्न झाला.

---------

पगंती अन् कीर्तनही


डोहाळे जेवणासाठी लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी कीर्तनाचेही आयोजन केले होते. हे अनोखे डोहाळ जेवण आष्टी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला

.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.