बदलापूर येथे शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या आष्टीत शिवसेना (उबाठा) च्या वतीने निषेध

बदलापूर येथे शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या आष्टीत शिवसेना (उबाठा) च्या वतीने निषेध



 कडा /वार्ताहर                                                                                            -----------

बदलापूर येथे शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) च्या वतीने आष्टीत तहसीलदार बाळदत्त मोरे यांना निवेदन देऊन या घटनेतील अत्याचारी नराधमांना कठोर शिक्षा करण्याची शिवसेनेकडून मागणी करण्यात आली.

   


                                                            

आष्टी येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून बदलापूर येथील शाळेत चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करुन तहसीलदाांना निवेदन देऊन नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा. अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष राऊत, उपतालुकाप्रमुख अक्षय साप्ते, संघटक ज्ञानदेव मुटकुळे, सोमनाथ खिळे, विद्यार्थी सेनेचे शिवप्रसाद जाधव, बापुराव काळे, साईनाथ पाखरे, रामदास मोहिते, शिवाजी थोरवे,अब्रान शेख इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.