दौलावडगाव गणात मा.मंत्री सुरेश (आण्णा)धस यांचा भव्य जनसंवाद मेळावा संपन्न

 *दौलावडगाव गणात मा.मंत्री सुरेश (आण्णा)धस यांचा भव्य जनसंवाद मेळावा संपन्न*




दौलावडगाव / ..........

   नुकत्याच काही दिवसा वरती येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मा.मंत्री आमदार सुरेश आण्णा धस यांनी दौलावडगाव गणातील जुन्या नव्या फळीतील कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी सोनाई लाॅन मध्ये दौलावडगाव पंचायत समिती गणातील सर्व गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते,युवक मित्र व राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत व सेवा सोसायटी पदाधिकारी, शेतकरी वर्ग या सर्वांबरोबर सुरेश आण्णा धस यांनी संवाद साधला.

     यावेळी बोलताना ते म्हणाले मतदारसंघाच्या विकासासोबत सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत,  माझ्याकडे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्या, नागरिक यांचे प्रश्न सोडवण्याचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

  मागील दहा वर्ष विधानसभेचा सदस्य आमदार नसतानाही माझ्या कार्यकर्त्याला मी कोणाच्या दारात जाण्याची वेळ येऊन दिली नाही. आज रोजी आजी, माजी, आमदार विरोधी असतानाही  एकमेकांवर टीका करण्यापेक्षा दोघे मिळून माझ्यावरती टीका करत आहेत.

 कामाच्या व जनसंपर्क च्या माध्यमातून पक्षाचे उमेदवारी निश्चित मला मिळणार आहे असा विश्वासही कार्यकर्ते समोर त्यांनी व्यक्त केला. 

  यावेळी नागरिकांनी अण्णांचे स्वागत करत, मोठ्या संख्येने उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला. जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून आण्णांवर असलेला सर्वसामान्यांचा विश्वासच अण्णांना खुप बळ देत आहे.

  यावेळी सिध्देश्वर ढोले,गोटीराम कोहक,बाबू खान,रघूशेठ घुले, महेमुद शेख यांची भाषणे झाली.

  माजी सभापती अशोक इथापे,सिद्धेश्वर ढोले,केळ चे सरपंच सचिन दळवी,माजी सरपंच महेमुद शेख,विठ्ठल नाना अकोलकर, कारखेल सरपंच रघुशेठ घुले, उपसरपंच बिबीशन दहातोंडे,वहाब पटेल,चेअरमन भास्कर थोरात,,मा.सरपंच एकनाथ वाणी, सरपंच सचिन घुले,माजी सरपंच अशोक दहातोंडे, सालेवडगाव सरपंच महेश कराळे,माजी सरपंच शिवाजी थोरात,मुरलीधर फसले,बाबू खान, मौलाना साहेब,बन्सी भाऊ मराठे,संदीप हिंगमीरे,सुनील घोडके,छगन हजारे,बाबासाहेब दहातोंडे, शिवाजी वांढेरकर, साहेबराव रोकडे,संदीपान रामगुडे,बबन बागले,शिवाजी शिंदे,मोहन मराठे,गोटीराम कोहक,पप्पु घुले,आबासाहेब शिंदे,राम काळे,सचिन आमले,संतोष आमले,नाना आमले,संजय चौधरी,सरपंच पापा गुंड,संदीप चव्हाण, गणेश फसले,भास्कर मुळे,चेअरमन फक्कड यांच्यासह नागरिक,ग्रामस्थ,युवक कार्यकर्ते,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.