आष्टी विधानसभा मतदार संघात सुरेश पाटलांच्या नावाची चर्चा जोरात..!

 आष्टी विधानसभा मतदार संघात
सुरेश पाटलांच्या नावाची चर्चा जोरात..!




आष्टी (प्रतिनिधी)

     लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसतो न बसतो तोच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आष्टी-पाटोदा - शिरूर मतदार संघात अनेक पांरपारिक मात्तबर नेते असले तरी यंदाच्या आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघात विधानसभा निवडणुकांची प्रत्यक्ष सुरुवात होण्या आधीच समाजसेवक सुरेश पाटील हे नाव प्रामुख्याने गाव,वाडी,शहर,आणी वस्त्यांमध्ये चर्चिले जात आहे.आजपर्यंत आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघात धनदांडग्या नेतेमंडळीनी सत्ता काबीज करुन हा महत्त्वाचा मतदार संघ विकासाच्या ऐवजी भकासच करुन टाकलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक येणाऱ्या विधानसभेत उमेदवार म्हणून राहतील अशी चर्चा ही जोरात चालू असतांनाच २३१ आष्टी विधानसभेतून शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील हेच एकमेव उमेदवार असतील असे आताच या मतदार संघात बोलले जात आहे. सुरेश पाटील निष्कलंक व्यक्तीमत्वाचे,अभ्यासु,आणी या तालुक्यातील वाडी वस्ती ते शहरातील समस्येची जाण असणारे असल्यामुळे सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या या मतदार संघातील शहर, गावोगावी,वाडी,वस्त्यांमध्ये ,पारावर होतांना दिसत आहे. सध्या मराठा समाजाचा अस्मितेचा विषय ठरलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सुरेश पाटील हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या आंदोलनापासुनचे खंदे समर्थन करणारे आणि वेळोवेळी पाठिंबा देणारे आहेत."शिव संघर्ष" या सामाजिक ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे सुरेश पाटील हे पदाधिकारी तर आहेतच परंतु समाज मणाचा आरसा समजल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ तथा अभ्यासु पत्रकार म्हणुनही सुरेश पाटील सुपरिचित आहेत. त्यामुळे मराठा योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आगामी काळात विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचे ठरवल्यास किंवा पाठींबा देण्याचे ठरवल्यास सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार ,निष्कलंक अभ्यासु व्यक्तीमत्व,तळागाळातील नागरिकांच्या समस्यांची जाण असणाऱ्या आणी सदैव जमिनीवर घट्ट पाय रोवुन असणाऱ्या सुरेश पाटील यांनाच प्रथम प्राधान्य द्यावे लागेल अशी चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर (का.) मतदार संघात सध्या जोर धरत आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे जेंव्हा जेंव्हा बीड जिल्ह्यात दौरा करण्यासाठी येतात तेंव्हा तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील हे वेळोवेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षण व मराठा समाजापुढील आव्हाने याबाबत सखोल चर्चा करतांना दिसुन येतात आहे. आष्टी-पाटोदा-शिरूर कासार हा मतदारसंघ आजवर गब्बर झालेल्या नेतेमंडळीनी आश्वासनांची खैरात वाटत आणी साम दाम दंड भेद वापरुन सत्ता काबीज करत मात्र विकासा पासून कोसो दुरच ठेवलेला आहे. याविधानसभा मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरुन काढायचा असेल तर धनदांडग्यांची सत्ता उलथवून टाकुन आता विकासाची दुरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी निवडुन देणे गरजेचे आहे असे मत सध्या आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघातील नागरिकांचे झाले आहे त्यामुळे सध्या असा प्रतिनिधी म्हणून फक्त सुरेश पाटील यांच्यांकडे पाहीले जात आहे. सुरेश पाटील यांना मानणारा आणि त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारा खुप मोठा वर्ग व सामाजिक ग्रुप त्यांच्या पाठिशी आहे तसेच आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या मदतीला अहोरात्र वेळोवेळी धावून जाणारे तथा आपल्या हक्काचा माणूस म्हणून सुरेश पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्येंचा सखोल अभ्यास असणारे सुरेश पाटील असून मनोज दादा जरांगे यांनी जर सुरेश पाटील यांना पाठींबा दिला तर आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघाला येणाऱ्या विधानसभेत कार्यक्षम आमदार मिळुन या मतदार संघाचा कायापालट होऊ या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलु शकतो अशी चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघात सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.