पीएसआय श्रीकृष्ण शिंदे विशेष सेवा पदकाने सन्मानीत..

 पीएसआय श्रीकृष्ण शिंदे विशेष सेवा पदकाने सन्मानीत..



आष्टी (प्रतिनिधी )

आष्टी पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे यांना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट सेवेबद्दल विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले आहे.. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर केली आहेत त्यामध्ये आष्टी पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे यांना गौरवण्यात आले आहे..

 पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदस्थापना मिळालेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये  नक्षलग्रस्त भागात हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा बसावा यासाठी अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन..

 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे... त्यांच्या या अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कार्या बद्दल यांचेवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे..

 त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.