धानोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी बनला पोलीस महाविद्यालयाच्या वतीने केला सन्मान

 धानोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी बनला पोलीस 
महाविद्यालयाच्या वतीने केला सन्मान




आष्टी प्रतिनिधी- तालुक्यातील धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी एस्सी शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला व उंदरखेड येथील अजिंक्य वामन याची नुकतीच पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल अजिंक्य वामन याचा महाविद्यालयाच्या वतीने सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सर्वसामान्य शेतकरी कुटंबात जन्मलेला अजिंक्य हा शालेय जीवनापासून हुशार होता आणि प्रयत्नांच्या परिकष्ठाने त्याला अखेर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये त्याची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ कैलास वायभासे, प्राध्यापक निसार शेख, प्राध्यापक विवेक महाजन, डॉ संजय झांजे, प्राध्यापिका अंजना गिरी, प्राध्यापक आतेश बनसोडे, प्राध्यापक सतीश तागड, प्राध्यापक ज्ञानदेव बोडखे, प्राध्यापक आजिनाथ गिलचे, डॉ. रमेश खिळदकर, प्राध्यापिका शेख शबाना, प्राध्यापिका रत्नमाला, प्राध्यापक अजिंक्य विधाते, सोमनाथ गिलचे, प्रल्हाद खोटे, गंजुरे आदींनी अजिंक्य वामन याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.