माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

 माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 



आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट मध्ये संस्थेचे अध्यक्ष मा आ श्री भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती विधाते मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्रा शाळा देऊळगाव व ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप श्रीमती विधाते मॅडम तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सुरेश माळी यांनी भुषवले तर प्रमुख पाहूणे देऊळगाव घाटचे सरपंच श्री रामकिसन ठोंबरे हे होते. याप्रसंगी शाळेतील प्राचार्य व सर्व शिक्षक बांधवानी श्रीमती विधाते मॅडम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री विधाते सरांनी केले. तर आभार श्रीमती विधाते मॅडम यांनी मानले. त्यानंतर जि प शाळेतील व विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकांना गोड जेवन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बांधवानी मोलाचे सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.