अहिल्यारत्न पुरस्काराने सौ.प्रतिमा अरुण काळे बारामती येथे सन्मानित.

 अहिल्यारत्न पुरस्काराने सौ.प्रतिमा अरुण काळे बारामती येथे सन्मानित.



     रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी रयत भवन बारामती येथे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने केलेल्या २९९ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती २०२४ आणि गुणगौरव समारंभ मध्ये पिंपरी चिंचवड येथील लेखिका, शिक्षिका,कवयित्री,सामाजिक कार्यकर्त्या,पर्यावरण प्रेमी सौ.प्रतिमा अरुण काळे यांना अहिल्यारत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार सोहळ्याचे आयोजन माननीय बबनराव आटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

     प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व चळवळीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या युवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.