बसस्थानक परिसरात खाजगी वाहनामुळे वाहतुकीची कोंडी
-----------------------
पोलिसांनी वाहतुक कोंडी करणा-या बेशिस्त वाहनांवर कारवाई करावी ------------
कडा / वार्ताहर ---------- नगर-बीड महामार्गावरील रस्ता चौपदरीकरणाचे काम चालू असल्यामुळे सिंगल रस्त्यावरुन वाहतुक चालू आहे. मात्र कडा येथे बसस्थानक परिसरात काही खाजगी वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची नित्याचीच कोंडी डोकेदुखी बनली आहे.
आष्टी तालुक्यात नगर-बीड महामार्गावर साबलखेड ते चिंचपूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे सध्या सिंगल रस्त्यावरुन वाहतुक चालू आहे. मात्र या रस्त्यावर काही खासगी वाहनधारक बेशिस्तपणे रस्त्यावरच आडवी वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. कडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक परिसरात या सिंगल रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे शालेय मुले, पादचारी व इतर ये-जा करणा-या वाहनांसाठी वाहतुक कोंडी नाहक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरील रस्त्यावर बेशिस्त वाहने उभी करुन वाहतुकीस अडथळा आणणा-या खाजगी वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. अशी मागणी नागरीकांतून करण्यात येत आहे.
-----------%%---------
stay connected