KOLHAPUR | कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदी धोका पातळी जवळ

 KOLHAPUR | कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदी धोका पातळी जवळ  



 - कोल्हापुरात गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहत आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कसबा बावडा शिये मार्गांवर तब्बल 2 फूट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पंचगंगा नदी घाटावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शहरात पाणी येण्याची शक्यता असल्याने नदीकाठी राहणारे लोक सतर्क झालेत.


मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 42 फूट 2 इंचावर पोहोचली असून पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरण 92 टक्के भरले असून आलमट्टी धरणातून सुमारे पावणे दोन लाख इतका पाण्याचा विसर्ग सुरूय. कसबा बावडा शिये इथल्या मार्गांवरही पाणी आल्याने हा मार्ग वाहतूकसाठी बंद करण्यात आलाय.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.