शंभरी गाठलेला टोमॅटो, पुन्हा चाळीशीत भूईमुगाची आवक घटली, शेंगांनी शंभरीचा भाव खाल्ला

 शंभरी गाठलेला टोमॅटो, पुन्हा चाळीशीत भूईमुगाची आवक घटली, शेंगांनी शंभरीचा भाव खाल्ला

-----------------

कडा / वार्ताहर

------------------

आठवडी बाजारात टोमॅटोच्या दरात अचानक आलेली तेजी अवघ्या आठवडाभरातच ओसरली, आता टोमॅटोचा दर शंभर रुपयांवरून पुन्हा एकदा चाळीस  रुपये पर्यंत खाली आला. 

मागील रविवारी आठवडी बाजारात टोमॅटोचे दर अचानक वाढून शंभर रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. टोमॅटोच्या दरात आलेल्या तेजीमुळे ग्राहक आणि विक्रेते चकित झाले होते.  मात्र पुन्हा एकदा टोमॅटोचा हा भाव झपाट्याने खाली घसरला असून, हाच दर आता तीस ते चाळीस रुपये किलो असा झाला. या अचानक तेजीचे कारण समजू शकले नाही. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे असे झाले असावे. असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान बाजारात भुईमुगाची आवक घटल्यामुळे भुईमुगाच्या शेंगा शंभर रुपये प्रति किलोपर्यंत विक्री केल्या जात आहेत. तर बटाट्याचा दर ही वाढून पन्नास रुपयापर्यंत पोहोचला आहे. पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे कोथिंबीर आणि मेथी मात्र स्वस्त झाली. कोथंबिर पाच ते दहा रुपये जुडी आणि मेथी दहा रुपयांना असा त्यांचा सध्याचा आठवडी बाजारात भाव झाला आहे.

--------%%--------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.