लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार चालू
अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटना चे अध्यक्ष धोंडीराम जावळे व उपाध्यक्ष युवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेडचे डीवायएसपी डेप्युटी वखारे साहेब यांना लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र यांच्या नावाखाली सर्रास डान्सबार चालू आहे या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे
लोककलाकारांच्या अडचणी संदर्भात हे निवेदन होते . तर जामखेड मधील सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार चालू आहे. त्यामुळे कलाकारांची उपासमार होत आहे शासनाने गोरगरीब कलावंतांना जगण्याचा एक आधार म्हणून लोकनाट्य संस्कृती कला केंद्राची लायसन्स दिलेली आहे पण त्याचा गैरवापर करून हे कला केंद्राचे मालक सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार चालू आहेत. वेळेची कुठलीही न मर्यादा ठेवत कला केंद्रे पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत चालू असतात मोठ मोठा साऊंड सिस्टिम चा आवाज सोडला जातो व यावर कोणीही दक्षता घेत नाही आम्हा गोरगरीब कलाकारांना कले शिवाय दुसरा कुठलाही आधार नाही हा याआधी पेटी वादक तबलावादक ढोलकी वादक व गाणे म्हणणारी गायिका असायची... व महाराष्ट्राची सांस्कृतिक जपणारी लावणी.... चालायची पण आता तसं नाही सांस्कृतिकच्या नावाखाली पूर्णपणे काळाबाजार चालू आहे त्या
गोष्टीला वेळच आळा घाला ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आम्हा गोरगरीब कलाकारांकडून दुसरा कुठलाही पर्याय नाही. हा डान्सबार तात्काळ जर बंद नाही केला तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत . आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत पण आम्हाला कुठेही यश मिळाले नाही असे निवेदनात उपाध्यक्ष युवराज गायकवाड यांनी म्हटले आहे .
महाराष्ट्रातील सगळ्या कलाकारांचा अहमदनगर येथे मेळावा होणार आहे व संघटनेतील सर्व पदाधीकारी कलेक्टर ऑफिस व एस पी ऑफीस अहमदनगर येथे निवेदन देऊन व स्वतः अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश रावजी लंके उपस्थित राहणार आहेत . असेही अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटना चे अध्यक्ष धोंडीराम जावळे व उपाध्यक्ष युवराज गायकवाड यांनी सांगितले .
stay connected