विशाळगडावरील घटना एक षडयंत्र ! सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र राहिले तरच आपल्या समाजाची प्रगती होईल ‼️ - इंजि.तानाजी जंजिरे व डॉ. नदीम शेख

 विशाळगडावरील घटना एक षडयंत्र ! सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र राहिले तरच आपल्या समाजाची प्रगती होईल ‼️ - इंजि.तानाजी जंजिरे व डॉ. नदीम शेख



      आष्टी( प्रतिनिधी)

     आपल्या देशात व राज्यात शेकडो जातीआहेत. जगात जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्माचे लोक आपल्या देशात राहतात. अनेक वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्या - गोविंदाने राहत आहेत. काही मतलबी मंडळी मात्र जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अशांतता  पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत .त्यामध्ये सत्ताधारी राजकीय मंडळी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे आम्हाला वाटते. विशाळगडावरील गजापूर वस्तीवरील हल्ला त्यातीलच एक प्रकार असावा असे आम्हाला वाटते.विशाळगडावरील घटनेमधून राजकीय गंध येत असल्याचे दिसते.युवकांनी या षडयंत्राला बळी पडू नये. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिले तरच समाजाची प्रगती होईल असे मत मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजि. तानाजी बापू जंजिरे व डॉ. नदीम शेख यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आष्टी येथील जिजाऊ वस्तीगृह येथे गुरुवारी ही पत्रकार परिषद झाली. यावेळेस संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक प्राचार्य शशिकांत कन्हेरे सर, मराठा सेवा संघाचे जेष्ठ कार्यकर्ते सर्व शिवश्री लक्ष्मण रेडेकर, भास्करराव निंबाळकर, बन्सीधर मोरे, ज्येष्ठ पत्रकार ऍड .सिताराम पोकळे आदी मान्यवर  उपस्थित होते. 



पुढे बोलताना इंजि. जंजिरे व डॉ. नदीम शेख यांनी सांगितले की ,विशाळगड अतिक्रमण आणि चार किमी अंतरावर असलेले गजापूर येथील हिंसा या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. विशाळगडावर असलेली रेहान मलिक दर्गा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून त्या परिसरात मंदिरे देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 136-158 अतिक्रमणे त्या परिसरात आहेत. मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते, संस्था व स्थानिक गावकऱ्यांनी वेळोवेळी शासनाला अतिक्रमण काढण्यासाठी निवेदने देऊनही शासन व प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याने सदरील घटना घडली आहे. अतिक्रमणाचे काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित अतिक्रमणे काढण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला गालबोट लावण्याचं काम कांहीं समाजकंटकांनी केले असल्याचे मत मराठा सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष तानाजी जंजिरे व डॉ. नदीम शेख यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही शासन कारवाई न करता वेळकाढूपणा करत आहे. म्हणून रविवार 14 जुलै रोजी छ. संभाजी महाराजांनी विशाळगडा वरील अतिक्रमण काढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. गडाच्या पायथ्याशी संभाजी ते गडावर जाण्यापूर्वीच एक जतथा गडावर पोहोचला होता .महाराज अधिकाऱ्यांशी बोलत असताना काही समाजविघातक शक्तींनी गडावरून दगडफेक चालू केली. गजापुर येथील मुस्लिम समाजाच्या घरांवर हल्ला करून त्यांच्या घरांची, गाड्यांची, लहान मुलांच्या खेळणीची व अनेक काळापासून असलेल्या रेहान मलिक दर्ग्याची तोडफोड केली आहे. या घटनेत एका विशिष्ट जमातीच्या निरपराध लोकांवर घरे सोडून जाण्याची वेळ आली. सदरील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. 



        लोकसभा निवडणुकीतील मराठा मुस्लिम ऐक्याने झालेल्या पराभवामुळे सत्ता पक्षाकडून राज्यात जातीय द्वेष पसरवून हिंसाचार घडविण्याचे दुष्कर्म केले जात आहे. असे मत दोन दिवसांपूर्वीच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. मराठा मुस्लिम समाजाने अशावेळी एकत्र येऊन यामागच्या अदृश्य शक्तीच्या मनसुब्यांना हाणून पाडले पाहिजे तसेच राज्य आणि जिल्ह्यात दोन्ही समाजाने शांतता राखून यामागील विघ्नसंतोषी वृत्तींना चपराक द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

                 राज्यातील विधानसभा निवडणुकीत मराठा मुस्लिम एकी कायम राहिल्यास जातीय द्वेष पसरविणाऱ्या शक्तींचा पराभव अटळ असल्याने जातीय तेढ निर्माण करून राज्यात अशांतता पसरविण्याचे पाप त्यांच्याकडून केले जात आहे. विशाळगड वरील घटनेतुन राजकीय गंध येत असून यामधून मतांच ध्रुवीकरण करण्याचा कट सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप जंजिरे यांनी केला आहे. युवा तरुणांनी जातीयवादी विचारांच्या षडयंत्राला बळी पडू नये व सामाजिक सलोखा जपावा व आपले प्रगतीचे मार्ग शोधावेत असे देखील आवाहन त्यांनी यावेळी  केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.