बेलगावच्या रेणुकामाता देवस्थानास शासनाचा "ब"दर्जा प्रदान
******************************
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार..
****************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बेलगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेले तसेच आटेगाव पुठ्ठ्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रेणुका माता देवस्थानास राज्यशासनाकडून
"ब" दर्जा प्रदान करण्यात आला आहे. "ब"दर्जा मिळावा यासाठी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी वेळोवेळी गेलेल्या पाठपुराव्याचे हे शक्य झाल्याने बेलगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
बेलगाव ग्रामस्थांचे आराध्य दैवत म्हणून तसेच नवसाला पावणाऱ्या जगदंबा मातेचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर असून या मंदिराच्या विकासात भर पडावी असा मानस "ब" दर्जाची आवश्यकता असल्याने उद्योजक प्रविण वारे व ग्रामस्थांच्या मागणीने तसेच माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांस "ब" वर्ग दर्जा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने शासननिर्णय काढून प्रदान केला आहे. या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मंत्रालयातील सचिव, मंत्री यांना वेळोवेळी केलेल्या पत्र व्यवहार आणि केलेल्या सूचनेमुळेच अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नांने प्राप्त झाली असून युवा उधोजक प्रविण वारे यांच्या वेळोवेळीच्या मागणीने हे यश मिळाल्याने सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ,रेणुकाई भक्तांनी आभार मानले तर बेलगाव ग्रामस्थांसाठी ही अतिशय आनंदाची बाब असून माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचा ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे बेलगांव ग्रामस्थांनी यावेळी सांगितले आहे.

%20(14).jpeg)
stay connected